Mahesh Zagde
Mahesh Zagde 
मुख्य बातम्या मोबाईल

नाशिकसाठी मी तयार, कोरोनाची स्थिती थांबवता येईल!

संपत देवगिरे

नाशिक : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जी घटना महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात घडली, त्याने खुप दुःख झाले. ही स्थिती सुधारता येईल. कोरोनाने निर्माण झालेले चित्र थांबवता येईल, असा माझा ठाम विश्‍वास आहे. नाशिकसाठी मी केव्हाही हवी ती सेवा देण्यास तयार आहे, असे मत निवृत्त सनदी अधिकारी आणि नाशिकचे माजी जिल्हाधिकारी व विभागीय महसूल आयुक्त महेश झगडे यांनी "सरकारनामा'ला सांगितले. 

ते म्हणाले, नाशिकसाठी तर केव्हाही तयार आहे. कोणतिही सेवा, मार्गदर्शन तसेच व्यावस्थापनासाठी मी काम करीन. सध्या कोरोनामुळे जी स्थिती निर्माण झाली आहे, त्याची काळजी वाटते. नागरिकांना, रुग्णांना अडचणी येतात. त्यामुळे ही स्थिती जेव्हढी लवकर निवळेल, तेव्हढे चांगले आहे. आज राज्यात कोरोनाविषयक जी स्थिती निर्माण झालेली आहे, त्यात तातडीने लक्ष घालुन सुधारणा करण्याची गरज आहे. एक पैसाही न घेता राज्यामध्ये कुठेही मी काम करायला मी तयार आहे. त्यासाठी मला वेतन, प्रवास भत्ता, महागाई भत्ता काहीही नको आहे. या स्थितीतून बाहेर पडण्यासाठी योगदान देण्याची माझी सदैव तयारी आहे. 

त्या संस्था कुठे आहेत? 
ते पुढे म्हणाले, आपल्याकडे जशा कामगारांच्या संघटना असतात, व्यापाऱ्यांच्या संघटना असतात, तशा जगातील मोठ्या औषध कंपन्यांच्याही जागतिक स्तरावरील संघटना असतात. यासंदर्भात "ओपीपी' ही एक संघटना आहे. औषध निर्मिती करणाऱ्या कंपन्यांच्या प्रश्‍नांवर, औषधांची उलाढाल यासंदर्भात त्या शासनावर दबाव टाकताता. पाठपुरावा करतात. भारतातील सर्व मोठ्या औषध कंपन्या आहेत. हजारो कोटींची उलाढाल असलेल्या या कंपन्यांची "ईडमा" म्हणून संघटना आहे. याशिवाय औषधांचा हा जो व्यापार आहे, तो जवळपास दिड लाख कोटींचा आहे. त्याच्याशी संबंधीत संघटना आहेत. आज बिकट स्थिती निर्माण झालेली असताना, या सर्व संघटना कुठे कुठल्या बिळात जाऊन बसलेल्या आहेत. व्यापारासाठीच या संस्था आहेत का?. सध्या काय चालले आहे?. हे मानवतेवरील संकट आहे. त्यात दृष्टिकोण बदलून काम करण्यास पुढे यायला हवे. त्यात सगळेच आले तर जास्त चांगले. 
... 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT