I don't think Sharad Pawar is doing it wholeheartedly: Chandrakant patil
I don't think Sharad Pawar is doing it wholeheartedly: Chandrakant patil  
मुख्य बातम्या मोबाईल

शरद पवार ते काम मनापासून करताहेत, असं वाटत नाही : चंद्रकांतदादा 

सरकारनामा ब्यूरो

पुणे : "ज्येष्ठ नेते शरद पवार यांना राज्य सरकारला वारंवार प्रोटेक्‍ट करावं लागतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भलामण करावी लागते, याचं वाईट वाटतं. पण, हे ते मनापासून करत असतील, असं वाटत नाही. सरकार एकत्र चालवायचं आहे; म्हणून पवार मुख्यमंत्री ठाकरे यांची भलामण करत आहेत,' असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात केले. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोलापूर दौऱ्यावरही पाटील यांनी टीका केली. मुख्यमंत्र्यांनी धावत प्रवास करून उपयोग नाही, त्यांनी कोरडा प्रवास नये. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत, ते निर्णय घेऊ शकतात. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ठाकरे यांनी तातडीने मदत देण्यासंदर्भात निर्णय घ्यावा, त्यासाठी पंचनामे करण्याची गरज नाही, असेही पाटील म्हणाले. 

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासंदर्भात उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारकडे मागणी करणार असल्याचे सांगितले होते. तसेच, केंद्र सरकारने आमचे पैसे वेळच्या वेळी दिले असते तर आम्हाला तुमच्या पुढे हात पसरण्याची वेळ आली नसते, अशी टीका केली होती. 

मुख्यमंत्र्यांच्या टिकेला उत्तर देताना प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले की, प्रत्येक वेळी केंद्र, केंद्र करायचं नसतं. आपत्तीच्या वेळी पहिली मदत राज्य सरकारने करायची असते. त्या नंतर केंद्राकडे मदत मागायची असते. राज्य सरकारने आधी मदत घोषित करावी, केंद्रकडून जे मिळेल ते बोनस समजायचे, असा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना मुख्यमंत्री ठाकरे यांची वारंवार भलामण करावी लागते, त्यांना प्रोटेक्‍ट करावं लागतं, याचं वाईट वाटतं. हे ते मनापासून करत असतील, असं वाटत नाही. मात्र, सरकार एकत्र चालवायचं; म्हणून शरद पवार मुख्यमंत्र्यांची भलामण करताहेत. बाबा मी या वयात इतका फिरतोय, तू ही किमान बाहेर पड, असं पवारांना वाटत असेल, असा टोमणा चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांना मारला. 

Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT