Konkan-NCP-Melava
Konkan-NCP-Melava 
मुख्य बातम्या मोबाईल

पालघरमध्ये काळजीपूर्वक निर्णय घेतले गेले असते तर तिथे निकाल वेगळा लागला असता - शरद पवार 

सरकारनामा

नवी मुंबई : " देशात लोकांचे मन आणि मत बदलत आहे. उत्तर प्रदेशात रिक्त झालेल्या जागेवर भाजपला पराभव स्वीकारावा लागला. भाजपच्या निवडून आलेल्या जागाही त्यांनी गमावल्या. पालघरमध्ये जर काळजीपूर्वक निर्णय घेतले गेले असते तर कदाचित तिथेही निकाल वेगळा लागला असता," असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे  राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व्यक्त केले.

  वाशी येथे  शरद पवार   उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे कोकण पदवीधर मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा   मेळावा बुधवारी घेण्यात आला . त्यावेळी ते बोलत होते . यावेळी  कोकण पदवीधर निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे नजीब मुल्ला यांना उमेदवारी घोषित करण्यात आली. 

यावेळी बोलताना शरद पवार पुढे म्हणाले ," येणाऱ्या सर्व निवडणुका आता आपल्याला एकत्र राहून लढलं पाहिजे. त्यामुळे नजीब मुल्लाला निवडून देण्यासाठी आपल्याला अहोरात्र काम करावे लागेल.   यश आपल्याला नक्कीच मिळेल. आपण हे काम आव्हान म्हणून स्वीकारले पाहिजे. "

" छत्रपती शिवाजी महाराज यांनी सामान्यांना संघटित करत स्वराज्याची स्थापना केली. त्यांच्या सैन्यात सर्व जाती-जमातीचे लोक होते. सर्व समाज घटकातील लोकांना एकत्र आणून लोकांसाठी राज्य चालवायचे अशी महाराजांची भूमिका होती. त्याचप्रमाणे नजीब मुल्लाही काम करत आहेत," असे म्हणात अतिशय चांगला उमेदवार गणेश नाईक यांनी निवडल्याबद्दल त्यांचे व त्यांच्या सहकाऱ्यांचे शरद पवार यांनी अभिनंदन केले. 

या मेळाव्यासाठी राष्ट्रीय सरचिटणीस खा. डी.पी.त्रिपाठी, राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते गणेश नाईक, मुख्य प्रवक्ते नवाब मलिक, माजी विधान सभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, आ. शशिकांत शिंदे, आ. भास्कर जाधव, आ. जितेंद्र आव्हाड, कोषाध्यक्ष आ. हेमंत टकले, आ. प्रमोद हिंदुराव, आ. अनिकेत तटकरे, शेकापचे आ. जयंत पाटील, विवेक पाटील, बाळाराम पाटील, काँग्रेसचे आ. भाई जगताप, आ. हर्षवर्धन पाटील, संजीव नाईक, संदीप नाईक, सागर नाईक, राष्ट्रवादी काँग्रेससह काँग्रेस, शेकापचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT