If dont pay for Ram temple we will be expelled from Dharma threats to nana patole
If dont pay for Ram temple we will be expelled from Dharma threats to nana patole 
मुख्य बातम्या मोबाईल

राम मंदिरासाठी पैसे न दिल्यास धर्मातून बाहेर काढू; नाना पटोलेंना धमकी

वृत्तसंस्था

मुंबई : राम मंदिर उभारणीसाठी देशभरात निधी संकलन केले जात आहे. काही लोक आपल्याकडे निधी मागण्यासाठी आले होते. त्यांनी पैसे न दिल्यास धर्मातून बाहेर काढू असे म्हटल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. 

अयोध्येमध्ये राम मंदिर उभारण्याचे काम सुरू आहे. मंदिर उभारणीसाठी  निधी संकलन केले जात आहे. राष्ट्रपती, पंतप्रधानांसह अनेकांनी यासाठी निधी दिला आहे. मंदिर उभारणीसाठी अनेकांनी चांदीच्या वीटाही दिल्या आहेत. निधी संकलनाला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या निधी संकलनावर काँग्रेससह अन्य काही विरोधी पक्षांनी टीकाही केली आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही टीका केली आहे. ते म्हणाले, भगवान श्रीरामाच्या नावाने निधी मागण्यासाठी काही लोक माझ्याकडे आले होते. मी त्यांना विचारले की, 30 वर्षांपूर्वी तुम्ही राम मंदिर बनविण्यासाठी पैसे घेऊन गेला होता, ते पैसे कुठे आहेत. त्यानंतर ते म्हणाले की, जर तुम्ही पैसे दिले नाहीत तर तुम्हाला धर्मातून बाहेर काढू, असा आरोप पटोले यांनी केला आहे. 

दरम्यान, पटोले यांनी आज विधानसभेतही राम मंदिरासाठी सुरू असलेल्या निधी संकलनावर प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, श्री रामाच्या नावाखाली देणग्या गोळ्या करण्याचा ठेका भाजपने घेतला आहे का? ही टोलवसुली सुरू आहे. हा अधिकारी भाजपला कुणी दिला आहे? निधी न दिल्यास त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी आल्या आहेत, अशी टीका पटोले यांनी केली. 

पटोले यांच्या वक्तव्यावरून सभागृहात गदारोळ निर्माण झाला. विरोधकांनी या वक्तव्याचा जोरदार विरोध केला. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांना काही काळ सभागृहाचे कामकाज स्थगित ठेवावे लागले. तत्पूर्वी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक पवित्रा घेत पटोलेंना चर्चेचे आव्हान दिले. राम मंदिरावर चर्चेसाठी स्वतंत्र चर्चा लावा. आज त्यावर चर्चा नाही. ज्यांना खंडणी वसुली करण्याची माहिती आहे, त्यांना समर्पण कळणार नाही, अशी टीका त्यांनी केली. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT