If the market is open, then why ban onion exports? : sharad pawar
If the market is open, then why ban onion exports? : sharad pawar  
मुख्य बातम्या मोबाईल

मार्केट खुलं केलं म्हणता, मग कांदा निर्यातबंदी का करता? 

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : एकीकडे केंद्र सरकार मार्केट खुलं केलं म्हणतंय आणि दुसरीकडे तुम्ही नाशिकचा कांदा परदेशात निर्यात करायला बंदी घालता. केंद्र सरकारच्या धोरणात हा विरोधाभास आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कृषी विधेयकांवर आपली नाराजी व्यक्त केली. 

केंद्र सरकारने नुकतेच मंजूर केलेली कृषी विधायके, मराठा आरक्षण व इतर मुद्यांवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुंबईत आज पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्या पत्रकार परिषदेत त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले. 

केंद्र सरकारच्या कृषी शेतमाल आयात निर्यात धोरणावर शरद पवार प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले की नाशिकचा कांदा मुंबईत आणून का ठेवला, तर त्यावर सांगण्यात आले की कांद्याचे भाव वाढल्याने महागाई वाढत आहे. दररोजच्या जेवणात कांद्यावर किती खर्च करावा लागतो, याचा विचार करता कांद्यामुळे महागाई वाढली, असे म्हणणे संयुक्तीक नाही. महागाई वाढल्यामुळे परदेशातील सर्व संबंध रद्दबातल करायचे किंवा थांबवायचे हे योग्य नाही. 

सरकारकडून जे निर्णय घेतले जातात, त्याचे दुष्परिणाम बाहेरच्या बाजारात भारताबद्दल वाईट आहेत. श्रीलंकेचे तत्कालीन अध्यक्ष राजपक्षे यांना कृषी माल निर्यातीसंदर्भात मी भेटलो. त्या वेळी त्यांनी सांगितले की तुमच्याकडून धान्य खरेदी करणे आम्हाला फायद्याचे आहे. पण तुमच्या देशात किमती वाढल्या की तुम्ही निर्यातबंदी करता. तुम्ही निर्यातबंदी केली की आमची फजिती होते. कारण आम्ही तुमच्याकडून पुरवठा होणार, असे गृहीत धरुन नियोजन केलेले असते, असे त्यांनी सांगितले होते. नेमके हेच नुकतेच बांगलादेशमध्ये झाले. आपल्या कांदा निर्यातबंदीच्या निर्णयानंतर त्यांनी नापसंती व्यक्त केली आहे, असा दाखल शरद पवार यांनी या वेळी दिला. 

शेत, शेतीमाल आणि ग्राहक शेतकऱ्यांच्या दृष्टीने धोरणाचा उल्लेख या विधेयकात असला हवा, असा सदस्यांचा आग्रह आहे. तेच नेमके विधेयकात नाही. त्यामुळे राज्यसभेत गोंधळ झाला, असे त्यांनी सांगितले. 

किमान आधारभूत किमतीबाबत शरद पवार म्हणाले की पंजाब, हरियाना, वेस्टर्न यूपी येथील बाजार समितींतून फूड कार्पोरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने एमएसपीच्या दराने शेतीमाल खरेदी केला जातो. पण कायद्यात एमएसपी कायम ठेवण्याचा उल्लेखच नाही. त्याची मागणी सदस्य करत होते. सभागृहात त्याचे स्पष्टीकरण दिलेले नाही. आता ते त्यावर भाष्य करीत आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT