अक्कलकोट : परबसाहेब, अक्कलकोटचे बसस्थानक खूप जुने झाले आहे. खांबाच्या सळया उघड्या पडल्या आहेत, त्यामुळे हे बसस्थानक कधी दगा देईल, याचा नेम नाही. या बसस्थानकाचे काम निधीअभावी थांबत असेल तर निदान बीओटी तत्वावर तरी मंजुरी देऊन नवीन बांधकाम तातडीने हाती घ्यावे, अशी मागणी अक्कलकोटचे भारतीय जनता पक्षाचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे केली आहे. (If no available fund, build Akkalkot bus stand on BOT : KalyanShetty)
अक्कलकोट येथील बस स्थानकाची इमारत ही खूप जुनी असून ती जीर्ण झालेली आहे. पावसाळ्यात तर संपूर्ण स्थानक गळते, त्याच्या खांबांच्या सळया उघड्या पडलेल्या आहेत, त्यामुळे हे बसस्थानक कधी दगा देईल, याचा काही नेम नाही. ह्या बसस्थानक पाडून त्या ठिकाणी नव्याने बसस्थानक उभारण्याची गरज आहे. याबाबतचे निवेदन आमदार कल्याणशेट्टी यांनी परिवहन मंत्री परब यांना दिले आहे.
कल्याणशेट्टी यांनी निवेदनात म्हटले आहे की, अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह देशभरामधून लाखो भाविक येत असतात. त्यामुळे येथील बस स्थानकामध्ये कायम गर्दी असते. सध्याचे बसस्थानक हे खूप जुने असून ते जीर्ण झालेले आहे. बसस्थानकाची प्रचंड दुरवस्था झालेली आहे. यामुळे भक्तांची व स्थानिक नागरिकांची प्रचंड गैरसोय होते आहे. यापूर्वी सरकारकडून अक्कलकोटच्या बसस्थानकाच्या नवीन इमारतीस मंजुरी मिळालेली आहे. पण, निधीअभावी या इमारतीचे काम सुरु होण्यास विलंब होत आहे.
अक्कलकोट हे महाराष्ट्रातील मोठे तीर्थक्षेत्र आहे. येथे व्यावसायिक तत्वावर सुध्दा बसस्थानकाची निर्मिती होऊ शकते. त्यामुळे निधीमुळे या बसस्थानकाचे काम थांबले असेल तर आपण ‘बीओटी’ तत्त्वावर या बसस्थानकाची उभारणी करावी. त्यामुळे नागरीक, भक्त आणि प्रवाशाची गैरसोय दूर होण्यास मदत होईल. आता याबाबतीत कोणताही निर्णय होऊ द्या, पण तो तातडीने होणे गरजेचे आहे, असे आमदार कल्याणशेट्टी यांनी निवेदनाद्वारे परिवहन मंत्र्यांना साकडे घातले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.