Nitesh-Rane
Nitesh-Rane 
मुख्य बातम्या मोबाईल

आंबा कॅनिंगचा दर उतरल्यास कडक पावले उचलणार -नितेश राणे 

सरकारनामा वृत्तसेवा

कणकवली:  जिल्ह्यातील आंबा बागायतदारांकडून कॅनिंगसाठी ज्या कंपन्या दर ठरवत आहेत त्यामुळे बागायतदार अडचणीत सापडले आहेत. बागायतदारांना अपेक्षित दर न मिळाल्यास आम्ही कडक पावले उचरलणार आहोत, असा इशारा आमदार नितेश राणे यांनी येथे आज पत्रकार परिषदेतून दिला. 

जिल्ह्यात  एलईडी फिशींग  बंदीनंतरही कायम सुरू असून कारवाईची अंमलबजावणी होत नसल्याने याला सत्ताधारी जबाबदार असल्याची टिकाही त्यांनी  केली. यावेळी  कृषी उत्पन्न बाजार समितीच सभापती प्रकाश राणे, देवगडचे संदीप साटम आदी उपस्थित होते.

 श्री. राणे म्हणाले, "जिल्ह्यातील आंबा उत्पादकांकडून सात कॅनिंग कंपन्या केवळ 16 रूपये दर देत आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीने याबाबत वारंवार सुचना दिल्या आहेत तरीही शेतकऱ्यांची पिळवणूक होत असून ती थांबली नाही तर आम्हाला ठोस भूमिका घ्यावी लागले. दर पाडण्याची पद्धत सध्या सुरू आहे. कॅनिंग कंपन्यांनी योग्य वेळी संवाद साधून ठोस निर्णय न दिल्यास आमची ताकद दाखवून देवू. आंबा उत्पादकांवर अन्याय होवू देणार नाही. त्यामुळे योग्य तो दर त्यांनी द्यावा " .

ते म्हणाले, "केंद्र आणि राज्य सरकारने एलईडी फिशींगला बंदी घातली. यावेळी नेत्यांनी पाठ थोपटून घेतली. मात्र विधिमंडळात आपण आवाज उठविला. बंदी असतानाही योग्य ती अंमलबजावणी होत नाही. बंदीची घोषणा होवूनही एलईडीने फिशिंगचे अनेक प्रकार सध्या सुरू आहेत. "

"अधिकारी नसल्याने कारवाई होत नाही. कायदा तुडविण्याचा प्रकार सुरू राहिल्यास आम्ही कायदा हाती घेवू. मच्छीमारांवर अन्याय होवू देणार नाही. एलईडी फिशिंग न थांबल्यास त्या बोटी दिसतील त्यांची सुरक्षिततेची जबाबदारी आमची राहणार नाही ,"असा इशारा दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT