Donald Trump, Joe Biden
Donald Trump, Joe Biden 
मुख्य बातम्या मोबाईल

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महाभियोगाची कारवाई? ; जो बायडन म्हणतात...

वृत्तसंस्था

वॉशिंग्टन : डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी युए कॅपिटलमध्ये घातलेल्या गोंधळानंतर अमेरिकन काँग्रेस आता ट्रम्प यांच्यावर महाविभियोग प्रक्रिया चालवण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे भावी राष्ट्रपती जो बायडेन यांनी ट्रम्प यांच्यावर कारवाई करण्यासाठी दबाव वाढवला आहे. त्यांनी आपल्या टि्वरटवर पोस्ट करत म्हटले आहे. की, अमेरिकन कायदा कोणत्याही शक्तिशाली व्यक्तिच्या बचावासाठी नाही. 

जो बायडेन म्हणाले की, अमेरिकन राष्ट्रपती कायद्यापेक्षा मोठे नाहीत. न्याय हा सर्वसामान्यांच्या सेवेसाठी आहे. कोणत्याही शक्तिशाली व्यक्तीच्या बचावासाठी नाही. 

अमेरिकेचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांना कॅपिटॉलवर हल्ला केला होता. यावरुन मोठा गदारोळ सुरू असून, ट्रम्प हे चांगलेच अडचणीत आले आहेत. या गदारोळात झालेल्या हिंसाचारात पाच लोकांचा मृत्यू झाला आहे. या माध्यमातून ट्रम्प अमेरिकन काँग्रेसवर दबाव निर्माण करत असल्याचे सांगण्यात येत आहे. 

युएस कॅपिटलमध्ये झालेल्या गोंधळानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर सर्व स्तरातून टीका होतेय. डेमोक्रॅटिक पक्षाने त्यांच्यावर महाभियोग चालवण्याची तयारी केली असून त्या संबंधी न्याय विभागाकडे सल्ला मागितला असल्याचे सांगण्यात येत आहे. 

डोनाल्ड ट्रम्प यांनी राजीनामा द्यावा

अमेरिकन संसदेच्या स्पीकर नॅन्सी पेलोसींनी या घटनेवर प्रतिक्रिया देताना म्हणाल्या की, आपल्या समर्थकांना कॅपिटलमध्ये प्रवेश करण्यासाठी पोत्साहन देण्याच्या मुद्यावरुन डोनाल्ड ट्रम्प यांनी जर राजीनामा दिला नाही. तर, सदन त्यांच्याविरोधात महाभियोगाची प्रक्रिया सुर करेल. डोनाल्ड ट्रम्प यांनी राजीनामा द्यावा आशा सर्व सदस्यांनी व्यक्त केली आहे. तसे न झाल्यास ट्रम्प यांच्यावर 25 वी घटनादुस्ती आणि महाभियोगाची प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. 

अमेरिका परराष्ट्र धोरणांशी संबंधित कमिटीचे अध्यक्ष ग्रेगरी मीक्स यांनीदेखील ट्रम्प यांच्यावर महाभियोगाचा प्रस्ताव सुरु करण्यात यावा अशी मागणी केली आहे. येत्या 20 जानेवारीला जो बायडेन हे अमेरिकेच्या राष्ट्रपती पदाची शपथ घेणार आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT