sr20.jpg
sr20.jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

महापालिका निवडणूक एकत्र लढविणार : संजय राऊत

सरकारनामा ब्युरो

पुणे : "महापालिका निवडणूक एकत्र लढण्याचा फायदा सत्ता स्थापनेसाठी होईल, पुणे व इतर महापालिका निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढतीलच पण, काँग्रेसलाही यात सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्न केले जातील," असे खासदार संजय राऊत यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत सांगितले. 

संजय राऊत म्हणाले की, ज्या शहरात ज्या पक्षाची ताकद जास्त असेल, त्या पक्षाच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविली जाईल. पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरात राष्ट्रवादीची ताकद जास्त आहे. त्यामुळे त्या ठिकाणी राष्ट्रवादीला संधी मिळेल. सत्ता परिवर्तनासाठी एकत्र लढणं गरजेचे आहे. 

पेट्रोल दरवाढीबाबत राऊत म्हणाले की, इंधन दरवाढीचा चटका भाजच्या पदाधिकाऱ्यांनाही बसत असेल. नरेंद्र मोदींच्या धोरणांवर टीका करणं म्हणजे देशद्रोही ठरवणं, हे चुकीचं आहे. राष्ट्रहितासाठी मोदींवर टीका करणं योग्य आहे. सध्या देशात छुप्या पद्धतीनं आणीबाणी लागू झाली आहे. 


हेही वाचा : ...अशा व्यक्तव्यांमुळे चंद्रकांतदादाचं हसं होत...राऊतांचा टोला..
 
पुणे : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील यांनी काल पुण्यात दिवंगत राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्याविषयी चुकीचे विधान केले. त्यामुळे ते चर्चेत आले आहेत. 'अब्दुल कलाम यांना नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती केलं,' असं चुकीचं विधान चंद्रकांत पाटील यांनी काल केलं होत. या त्यांच्या विधानावरून सोशल मीडियावर खोचक टीका होत आहेत. नेटकऱ्यांनी पाटील यांनी ट्रोल केलं आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील यांच्या त्या विधानाचा समाचार घेतला. संजय राऊत म्हणाले की, त्यांच्या व्यक्तव्यामुळे त्यांचेच हसं होत आहे. काही जणांना श्रेय़ घेण्याची सवय असते. डाँ कलाम हे सर्वमान्य उमेदवार होते. कलाम यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार करण्यात अटलबिहारी वाजपेयी, आणि प्रमोद महाजन यांचा वाटा होता. कलाम उमेदवार व्हावेत, म्हणून सर्व पक्षांच्या नेत्यांनी प्रयत्न केले होते. 

राऊत म्हणाले की माझ्या ज्ञानानुसार, ज्यावेळी कलाम यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार करण्याची प्रक्रिया सुरू होती, तेव्हा मोदी हे राष्ट्रीय राजकारणात नव्हते. आमचं ज्ञान कमी असेल, पण पाटील यांच्या अशा व्यक्तव्यांमुळे त्यांचेच हसं होत आहे. कलाम हे मुस्लिम होते म्हणून नव्हे तर ते संशोधक होते म्हणून त्यांना संधी दिली होती. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT