Impose Presidents rule in Gujrat Demands Sanjay Raut
Impose Presidents rule in Gujrat Demands Sanjay Raut 
मुख्य बातम्या मोबाईल

पहिल्यांदा गुजरातमध्ये राष्ट्रपती राजवट लावा : संजय राऊत

सरकारनामा ब्युरो

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काल संध्याकाळी मातोश्रीवर भेट झाली. दोन नेत्यात दीड तास  चर्चा झाली. कुणी सरकारच्या स्थिरते बाबत बातम्यांचा धुरळा ऊडवीत असतील तर ती निव्वळ पोटदुखी समजावी. सरकार मजबूत आहे. चिंता नसावी, अशा शब्दात शिवसेना नेते संजय राऊत यांनी विरोधकांना सुनावले आहे. 

करोनावर लस आणि   ठाकरे सरकार पाडण्याचा डोस विरोधकांना  सापडायचा आहे. संशोधन जारी है......
विरोधकांनी तात्काळ quarantine व्हावे हेच बरे..
महाराष्ट्र अस्थिर करण्याचे प्रयत्न अंगलट येतील....Boomerang..., असे म्हणत राऊत यांनी भाजपला चिमटा काढला आहे. 

राज्यात गेले दोन दिवस राजकीय घडामोडी घडत आहेत. विविध नेते राज्यपालांची भेट घेत आहेत. त्यातून राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती राजवट लागेल, अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. त्याबाबतही राऊत यांनी भाष्य केले. ''राष्ट्रपती राजवटीसाठी सर्वात सक्षम केस ही गुजरातची केस आहे. सुरुवात तिथून व्हायला हवी. कालच गुजरात हायकोर्टानं जे निष्कर्ष काढलेत, तिथले हॉस्पिटल्स म्हणजे अंधारकोठड्या झाल्यात असं म्हटलं. त्यानंतर खरंतर तिथल्या राज्यपालांनी हालचाल करायला पाहिजे,'' असेही राऊत म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT