China Deploying Bofors Guns on China Border
China Deploying Bofors Guns on China Border 
मुख्य बातम्या मोबाईल

लडाख प्रांतात सीमेवर बोफोर्स तैनात? चीनला रोखण्यासाठी भारताची तयारी

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : लडाख प्रांतात चीनने केलेल्या घुसखोरीनंतर भारताने आता चिनी सैन्याला रोखण्यासाठी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर बोफोर्स तोफा नेण्यास सुरुवात केल्याची बातमी एका वृत्तवाहिनीने दिली आहे. या ठिकाणी सैन्याच्या हालचालींसाठी रस्ते व पूल बांधण्याचे कामही वेगाने सुरु करण्यात आले असून विमाने उतरवण्यासाठी धावपट्टीही तयार करण्यात येत असल्याचे या वृत्तात म्हटले आहे. 

चीन भारतीय हद्दीत घुसखोरी करत असल्याचा आरोप अमेरिकेने नुकताच केला होता. दरम्यान पूर्व लडाख भागात चिनी सैन्य मोठ्या प्रमाणावर घुसले असल्याची कबूली संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनीही दिली आहे. गेल्या महिन्यापासून उत्तर सिक्कीम व लडाख भागात घुसखोरीच्या मुद्द्यावरुन भारत व चीन यांचे संबंध ताणले गेले आहेत. दरम्यान, या मुद्यावरुन दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांमध्ये सहा जूनला चर्चा होणार आहे. हा भाग आपला असल्याचा चीनने दावा केला आहे. त्यामुळे चीनच्या सैनिकांनी मोठ्या संख्येने तेथे घुसखोरी केली आहे. याबाबत भारताने आवश्यक ती पावले उचलली आहेत, असेही राजनाथसिंह यांनी स्पष्ट केले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT