indorika maharaj.
indorika maharaj. 
मुख्य बातम्या मोबाईल

किर्तनकार इंदोरीकरांच्या विरोधातील केस मजबूत; शिक्षा होऊ शकते : सरकारी वकील

गोविंद साळुंखे

शिर्डी : प्रसिद्ध किर्तनकार इंदोरीकर महाराजांच्या वादग्रस्त विधानाबाबत आज संगमनेर न्यायालयात पहिली सुनावणी झाली. यानुसार त्यांना आता पुढील तारीख सात आॅगस्ट देण्यात आली आहे.  होणार आहे. या वेळी त्यांना स्वतः न्यायालयात हजर राहण्याचा आदेश देण्यात आला आहे. त्यांना या वेळी वकिलामार्फत जामीन घ्यावा लागेल.

पूत्रप्राप्तीबाबत इंदोरीकर महाराजांनी आपल्या किर्तनात वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर त्यांच्या विरोधात न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज संगमेर सत्र न्यायालयात याबाबतची पहिली सुनावणी झाली. सरकारतर्फे अॅड. लीना चव्हाण यांनी बाजू मांडली. इंदोरीकरांनी अद्याप आपला वकील दिलेला नाही. आज केवळ समन्स बजाविण्याचे काम न्यायालयात झाले. 

या कार्यवाहीनंतर पत्रकारांशी बोलताना चव्हाण म्हणाल्या की अतिशय बळकट असा हा खटला आहे. इंदोरीकर महाराजांनी कायद्याचे उल्लंघन केले आहे. त्यांचे विधान सोशल मिडियातून संपूर्ण राज्याने ऐकले आहे. त्यामुळे त्यांना शिक्षा होऊ शकते. या खटल्याची पुढची तारीख सात आॅगस्ट ठेवण्यात आली आहे. त्यासाठी त्यांना स्वतः न्यायालयात यावे लागेल. वकिलामार्फत जामिनासाठी अर्ज करावा लागेल. न्यायालयाचा हा निर्णय अमान्य असल्यास त्यांना वरच्या न्यायालयात जाऊन खटला थांबविण्यासाठी अर्ज करावा लागेल. 


प्रसुतीपूर्व गर्भलिंग चिकित्सा नियंत्रण कायद्याच्या (पीसीपीएनडीटी) भंग केल्याच्या आरोपाखाली त्यांच्या विरोधात न्यायालयात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. इंदोरीकर महाराजांनी आपल्या विधानाबाबत केलेला खुलासा जिल्हास्तरीय समितीने यापूर्वीच फेटाळला आहे. त्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता संगमनेरच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. या प्रकरणाचा पाठपुरावा अंधश्रद्धा निर्मूलन समितीनेही केला होता. 

पुत्रप्राप्तीसाठी सम-विषम तिथीचा फॉर्म्युला किर्तनातून सांगितल्याने प्रसिद्ध किर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्यावर प्रचंड टीका झाली होती. दोन तासांच्या किर्तनात एखादे वाक्य चुकीचे जाऊ शकते, असे सांगत इंदोरीकर महाराजांनी कीर्तन सोडून शेती करेल, असे नंतर एका कीर्तनात सांगितले होते.  निवृत्ती देशमुख महाराज (इंदोरीकर) यांच्या कथित वक्तव्याच्या मुद्द्यासंदर्भात पुरावा म्हणून सादर करण्यात आलेली सीडी सायबर सेलकडे पाठविण्यात आली होती. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनीही नगरला येऊन इंदोरीकर महाराजांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानंतर तृप्ती देसाईंचे समर्थक व इंदोरीकर महाराजांचे समर्थक यांच्यात शाब्दिक वाद पेटला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT