Bhujbal Midc
Bhujbal Midc 
मुख्य बातम्या मोबाईल

औद्योगिक क्षेत्रातील पहिले कोरोना लसीकरण केंद्र सुरु

संपत देवगिरे

नाशिक : नाशिक औद्योगिक वसाहती मधील अंबड इंडस्ट्रियल व मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन (आयमा), एमआयडीसी आणि नाशिक महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु झालेले महाराष्ट्रातील औद्योगिक क्षेत्रातील पहिले कोरोना लसीकरण व आरटीपीसीआर चाचणी केंद्राचे आज राज्याचे अन्न,नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दुरदृष्य प्रणालीद्वारे उदघाटन करण्यात आले.

दुरदृष्य प्रणालीद्वारे आयोजित केलेल्या या उदघाटनावेळी श्री भुजबळ म्हणाले की, सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता महाराष्ट्र सरकारने काही कडक निर्बंध लागू केले आहेत.या आदेशात राज्य सरकारने औद्योगिक क्षेत्रातील सर्व कामगारांनी लवकरात लवकर केंद्र सरकारच्या नियमानुसार लसीकरण केले पाहिजे असे म्हंटले आहे. कामगारांच्या ह्या लसीकरणाच्या मोहिमेसाठी औद्योगिक क्षेत्र स्वतःहुन पुढे येत आहे ही गोष्ट भूषणावह आहे. कोरोनाच्या या लढाईत आता फक्त सरकारवर अवलंबून न राहता सर्वच क्षेत्रातील सामाजिक संस्था, औद्योगिक क्षेत्रातील मंडळींनी पुढे आले पाहिजे. त्याचप्रमाणे सरकारच्या ब्रेक दि चेन या मोहिमेनुसार कोरोनाची साखळी तोडली पाहिजे पण अर्थचक्र चालु ठेवण्यासाठी औद्योगिक क्षेत्रातील सर्व कामगारांचे लसीकरण देखील झाले पाहिजे.

या कार्यक्रमावेळी चेअरमन श्री. बेळे यांनी, या लसीकरण आणि कोरोना चाचणीचा लाभ हा २५०० कारखान्यांच्या कामगार व उद्योजकांना होईल. यासाठी पायोनियर रुग्णालयाची देखील मदत मिळणार आहे. कोरोना रूग्णांसाठी कोविड केअर सेंटर सुरू करण्याचा असोसिएशनचा मानस असल्याचे मत व्यक्त केले. असोसिएशन घेत असलेल्या या महत्त्वपूर्ण निर्णयाचे पालकमंत्र्यांनी कौतुक केले. कालच नाशिकला मेट- भुजबळ नॅालेज सिटी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, समता परिषद यांनी सूरू केलेल्या कोविड केअर सेंटर प्रमाणेच औद्योगिक क्षेत्रातील मंडळींनी आता पुढे येत कोविड सेंटर सुरू केले पाहिजे. औद्योगिक क्षेत्रातील मंडळींना हे सहज शक्य आहे. त्यामुळे सामाजिक दायित्व म्हणून सर्वांनी पुढे यावे असे आवाहन श्री भुजबळ यांनी केले. 

यावेळी आयमाचे अध्यक्ष वरूण तलवार, चेअरमन धनंजय बेळे, निखिल पांचाळ, `एमआयडीसी`चे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संतोष गवळी आदी उपस्थित होते.
...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT