Suraj Mandhare
Suraj Mandhare 
मुख्य बातम्या मोबाईल

उद्योग कामगारांची व्यवस्था दोन किलोमीटर परिसरात करु शकतात

सरकारनामा ब्युरो

नाशिक : कडक लॅाकडाउनच्या अंमलबजावणी (Lockdown implimentation) संदर्भात पालकमंत्री तसेच प्रधान सचिवांशी (Discussion with Guardian Minister & Principle secretary) चर्चा झाली. त्यानुसार उद्योगांना `इन सीटू` योजनेनुसार कारखान्याच्या दोन किलोमीटर परिसरात आपल्या कामगारांची व्यवस्थाकरून उद्योग सुरु ठेवता येतील, असे जिल्हाधिकारी सूरज मांढरे (Collector Suraj Mandhare) यांनी सांगितले.  

यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाने पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. त्याचा आशय असा, लॅाकडाउनच्या अधिसूचनेच्या अंमलबजावणी संदर्भात  पालकमंत्री आणि मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिवांशी झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाशी झालेल्या चर्चेनुसार काही सुचनांचे स्पष्टीकरण करण्यात आले आहे.

ग्राहकांना खरेदीसाठी जीवनावश्यक बाबींचे दुकानात जाण्यास प्रतिबंध आहे. मात्र विविध मार्गांनी घरपोच जीवनावश्यक बाबी प्राप्त करून घेण्याचा पर्याय पूर्णतः खुला आहे. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण साठा करून ठेवू नये. 

जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये गर्दीचे नियंत्रण करणे शक्य होत नाही. त्यामुळे बाजार समिती बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्याच वेळी शेतकऱ्याकडील भाजीपाला व अन्य माल स्विकारण्यासाठी विकेंद्रित व्यवस्था तयार करण्याची मुभा व निर्देश सर्व बाजार समित्यांना दिले आहेत. त्याप्रमाणे त्यांनी कार्यवाही करणे अपेक्षित आहे. शहरांतर्गत अथवा राज्यांतर्गत शेतमाल वाहतुकीस कोणताही प्रतिबंध करण्यात आलेला नाही. 

उद्योगधंद्यांच्या बाबतीत `इन सीटू` उद्योग सुरू ठेवण्याबाबत परवानगी दिली आहे. `इन सीटू`चा अर्थ ज्या उद्योगांमध्ये कर्मचाऱ्यांची भोजन व निवास व्यवस्था होऊ शकते त्यांनी तशी व्यवस्था करावी. ज्या उद्योगांमध्ये अशी व्यवस्था करण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नसेल तर अशा काही उद्योजकांनी एकत्र येऊन त्या उद्योगाच्या दोन किलोमीटर परिसरातील निवास योग्य इमारतीमध्ये कर्मचाऱ्यांची सोय करण्यास मुभा राहील. कमीत कमी मनुष्यबळात या कंपन्या सुरू ठेवणे. सर्व कर्मचाऱ्यांनी सतत ओळखपत्र जवळ बाळगणे अनिवार्य राहील. कर्मचारी त्यांच्या घरांकडे खासगी अथवा सार्वजनिक वाहतूक व्यवस्था द्वारे अथवा कंपनीच्या वाहतूक व्यवस्थेद्वारे ये-जा करतात.  त्यामुळे औद्योगिक क्षेत्र व निवासी क्षेत्रामध्ये संसर्ग पसरण्याचा धोका निर्माण होऊ नये तसेच निवासी भागातून औद्योगिक क्षेत्राकडे जाण्याच्या नावाखाली अन्य नागरिकांनी देखील मुक्त संचार करू नये या दृष्टीने ही सूचना देण्यात आली आहे. 

औषध व ऑक्सिजन निर्मिती कंपन्या निर्वेधपणे सुरू राहतील. औषध निर्मिती या संद्येमध्ये प्रत्यक्ष औषध निर्मिती सुरू राहण्याच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या अनुषांगिक उत्पादन कंपन्यांचाही समावेश होईल. कमीत कमी मनुष्यबळात या कंपन्या सुरू ठेवणे व सर्व कर्मचारी यांनी सतत ओळखपत्र जवळ बाळगणे अनिवार्य राहील. 

भाजी विक्रीची वेळ सकाळी ७ ते १२ ही निश्चित करण्यात आली आहे.  त्याकरिता सविस्तर आदेश संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेकडून पारित करण्यात आले आहेत. कोरोना प्रतिबंधक उपाययोजना नियमाचे उल्लंघन झाल्यास त्या ठिकाणची विक्री पुढील दहा दिवसांकरिता ताबडतोब बंद करण्यात येईल. दूध विक्री घरपोच करण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत. दुधाचे अत्यंत नाशवंत स्वरूप विचारात घेता घरपोच विक्री पूर्णतः शक्य नसल्यास दूध विक्री सकाळी ७ ते १२ व सायंकाळी ५ ते ७ या वेळेत स्थानिक स्वराज्य संस्था निश्चित करेल अशा ठिकाणावरून करता येईल.
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT