Shashikant Shinde
Shashikant Shinde  
मुख्य बातम्या मोबाईल

परमबीर सिंह यांच्या मालमत्तेची चौकशी करावी...

सरकारनामा ब्यूरो

मुंबई: माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या लेटरबाँबमुळे महाराष्ट्रात चांगलीच खळबळ माजवली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांची पाठराखण करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी परमबीर सिंह यांच्या हेतूबाबतच प्रश्नचिन्ह उपस्थित केला. परमबीर सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयात सोमवारी याचिका दाखल करताच राष्ट्रवादी काँग्रेसकडून परमबीर यांच्यावर करण्यात येणारी टीका आणखी बोचरी झाली. मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात आपण जे आरोप केले आहेत, त्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी सिंह यांनी या याचिकेद्वारे केली आहे. या याचिकेत आपण केलेल्या सर्व आरोपांची चौकशी करावी, त्यासाठी सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात यावेत, अशी मागणी केली आहे. दरम्यान, परमबीर सिंह यांच्या मालमत्तेची चौकशी ठाकरे सरकारने आपले अधिकार वापरून विनाविलंब करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी केली.   

शशिकांत शिंदे म्हणाले, माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांची बदली ही त्यांच्यावर आरोप झाल्यानंतर केली. तरीदेखील परमबीर सिंह यांनी याचिका दाखल केली आहे. यामागे बोलविता धनी कोण आहे, याचा तपास केला जावा. दिल्लीमध्ये गेले की काही जणांना चांगलेच बळ मिळते, असा टोलाही शिंदे यांनी लगावला.

एका आयपीएस अधिकाऱ्याने किती माया (मालमत्ता) जमवली, हे सर्वसामान्य जनतेलाही कळू द्या, यासाठी मी प्रयत्न करणार आहे. परमबीर सिंह यांना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घालता कामा नये. राज्य सरकारची व गृहमंत्री अनिल देशमुख यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला गेल्याने ठाकरे सरकारने अधिकाराचा वापर करून परमबीर सिंह यांची मालमत्ता नेमकी किती, याचा तपास करावा, असेही शिंदे म्हणाले. 


सचिन वाझे प्रकरणामुळे मुंबई पोलिस आयुक्त पदावरून परमबीर सिंह यांची उचलबांगडी करण्यात आली. त्यानंतर हेमंत नगराळे यांच्याकडे पदभार सोपवण्यात आला. यामुळे नाराज झालेल्या परमबीर सिंह यांनी त्यांच्याकडे सोपवलेला पदभार न स्वीकारता रजेवर गेले. दरम्यान, त्यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अत्यंत गंभीर असे आरोप केले. याबाबत परमबीर सिंह यांनी एक पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिले. यामध्ये सचिन वाझे यांना महिन्याला 100 कोटी रुपयांची वसुली करण्यास सांगितले होते, असा दावा या पत्रात करण्यात आला आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT