1amit_satam_bkc_hospital
1amit_satam_bkc_hospital 
मुख्य बातम्या मोबाईल

कोरोना सेंटर गैरप्रकाराबाबत 'या' आमदाराचे लोकायुक्तांना पत्र ...

सरकारनामा ब्युरो

मुंबई  : गोरेगावच्या कोरोना सेंटर उभारणीतील गैरप्रकारांची चौकशी करावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे अंधेरी (प.) येथील आमदार अतिम साटम यांनी राज्याच्या लोकायुक्तांकडे केली आहे. लोकायुक्त म. ल. ताहिलयानी यांना साटम यांनी पत्र लिहून ही मागणी केली आहे. 

साटम यांनी यासंदर्भात महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांना पत्र लिहून चौकशीची मागणी केली होती. मात्र, त्यांनी याबाबत काहीही कारवाई न केल्यामुळे आता साटम यांनी हे पाऊल उचलले आहे. गोरेगावच्या नेस्को संकुलात कोवीड केंद्र उभारण्याचे काम महापालिकेने निविदा न मागवता दिले. हे काम सुमारे अकरा कोटी रुपयांचे होते. हे काम ज्या बिल्डरला दिले त्याला यापूर्वी अशा प्रकारची कामे करण्याचा अनुभव नव्हता. तसेच हा बिल्डर हॉस्पीटलची किंवा वैद्यकीय उपकरणे तयार करण्याचे कामही करीत नाही. तरीही महापालिकेने चुकीच्या पद्धतीने त्यांना हे काम दिले आहे. त्यामुळे लोकायुक्तांनी याप्रकाराची चौकशी करून संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश द्यावेत, अशी मागणीही साटम यांनी केली आहे.

मिरा भाईंदरच्या आमदार गीता जैन यांना कोरोनाची लागण


मिरा भाईंदर शहरातील अपक्ष आमदार गीता जैन आणि अग्निशमन दल अधिकारी प्रकाश बोराडे यांना करोनाची लागण झाली आहे. गीता जैन यांची प्रकृती स्थिर असून त्यांना घरातच अलगीकरण करण्यात आले आहे. तर प्रकाश बोराडे यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे पी बी जोशी रुग्णालयात दखल करण्यात आले असून उपचार सुरु आहेत. मिरा भाईंदर शहरात करोना बाधित रुग्णांच्या संख्येत झपाटयाने वाढ होत आहे.

आता पर्यंत ३३२६ रुग्णांना करोनाची बाधा झाली असून १५३ रुग्णांचा बळी गेला आहे. दोन दिवसांपूर्वी आमदार गीता जैन यांना करोनाची लक्षणे जाणवू लागली होती. त्यामुळे त्यांनी स्वतःची तपासणी करून घेतली. त्यात त्यांचा अहवाल सकारात्मक आल्यामुळे त्यांनी स्वतःला घरीच अलगीकरण करून घेतले असून उपचार सुरु असल्याचे सांगितले.

गीता जैन यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना  देखील घरीच अलगीकरण होण्याचे आदेश दिले आहे. त्याचप्रमाणे २८ जूनला अग्निशमन दल अधिकारी प्रकाश बोराडे यांचा अहवाल सकारात्मक आल्यामुळे त्यांना सेक्टर ७ जवळील पी बी जोशी रुग्णालयात दखल करण्यात आले आहे. प्रकाश बोराडे यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे उपचार सुरु आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT