मुख्य बातम्या मोबाईल

महसूल आणि पोलिस भाऊ भाऊ: महादेव तांबडे

सरकारनामा ब्युरो

सोलापूर (प्रतिनिधी) : महसूल विभाग आणि पोलिस प्रशासन दोन्ही भाऊ आहेत. दोन्ही विभागांच्या कामकाजावरूनच प्रशासनाबाबत नागरिक आपले मत तयार करतात. सर्वसामान्य नागरिकांना त्रास होणार नाही, असे काम केल्यास निश्‍चित प्रशासनाची प्रतिमा चांगली राहील, असे प्रतिपादन पोलिस आयुक्त महादेव तांबडे यांनी केले. 

महसूल दिनानिमित्त महसूल शाखेतील ४६ कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट कर्मचारी म्हणून गौरविण्यात आले. मनपा आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे, अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, रोहयो उपजिल्हाधिकारी किशोर पवार, अन्नधान्य वितरण अधिकारी श्रीमंत पाटोळे, भूसंपादन अधिकारी प्रवीण सांळुखे, प्रांताधिकारी ज्योती पाटील, शिवाजी जगताप, प्रमोद गायकवाड, मारुती बोरकर आदी उपस्थित होते.  


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT