Satish Patil Jalgon
Satish Patil Jalgon 
मुख्य बातम्या मोबाईल

लाॅकडाऊनवरुन जळगावच्या राष्ट्रवादी काँग्रेस नेत्याचा घरचा आहेर

सरकारनामा ब्युरो

जळगाव : जळगावसह (Jalgaon) राज्यात कोरोना ची स्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. मात्र त्याला लॉक डाऊन करून चालणार नाही.तर राज्यातील मंत्र्यांनी प्रत्येक जिल्ह्यात जाऊन दोन दिवस आढवत घेवून प्रशासन गतिमान केल्यास परिस्थिती आटोक्यात येईल.असा घरचा आहेर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते व माजी मंत्री डॉ. सतीष पाटील यांनी दिला आहे. Jalgaon NCP Leader Satish Patil Oppose Lock Down

जळगाव जिल्ह्यात वाढत्या कोरोना (Corona) बाबत त्यांनी माजी पालकमंत्री म्हणून चिंता व्यक्त केली. सध्या शासन (Maharashtra Government) करित असलेल्या उपाय योजनांबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. तर विरोधी पक्ष या गंभीर स्थितीत काम न करता टीका करीत आहे.हे बरोबर नाही.असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.

राज्यातील सत्ताधारी मंत्र्यांबाबत ते म्हणाले, ''पक्ष बांधणीसाठी या मंत्र्यांनी प्रत्येक जिल्ह्यात दोन तीन दिवस मुक्काम केला. परंतु कोरोना ची साथ वाढत असताना याच मंत्रांनी जनतेला वाऱ्यावर सोडले असल्याचे दिसत आहे. कोरोना नियंत्रित करण्यासाठी लॉक डाऊन (Lock Down) करण्याचे सुचविले जाते आहे. मात्र हा उपाय होऊ शकत नाही. सरकारने प्रशासन गतिमान करण्यासाठी मंत्र्यांना प्रत्येक जिल्ह्यात दोन ते तीन दिवस पाठवून त्या.ठिकाणी तालुकानिहाय बैठका घेऊन आरोग्याचा आढवा घ्यावा,'' Jalgaon NCP Leader Satish Patil Oppose Lock Down

ते पुढे म्हणाले, ''आरोग्य यंत्रणा तसेच ज्या ठिकाणी आवश्यक असेल तेथे पोलिस यंत्रणा गतिमान करावी. त्यामुळे ग्रामीण भागापर्यंत नियोजन होवून परिस्थिती आटोक्यात येईल.केवळ मुंबई त बसून निर्णय घेवून प्रशासन चालणार नाही.कारण आता परिस्तिथी आणीबाणीची आहे. त्यामुळे आता मंत्र्यांनी हलले पाहिजे. विरोधकांनी आता टीका न करता साथ दिली पाहिजे तरच ही स्थिती आटोक्यात येईल."

Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT