BJP-wins-Jalgav-ZP
BJP-wins-Jalgav-ZP 
मुख्य बातम्या मोबाईल

जळगाव जि प : कॉंग्रेस- राष्ट्रवादीची मते फोडून भाजपने अध्यक्षपद जिंकले  

कैलास शिंदे

जळगाव :जळगाव जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणूकीत भारतीय जनता पक्षाने आपली सत्ता कायम राखली आहे.कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचा एकेक सदस्य पुटल्याने महाविकास आघाडी पुरस्कृत शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाला. अध्यक्ष उपाध्यक्षपदी भाजपचा उमेदवार विजयी झाला.


जळगाव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणूक घेण्यात आली. अध्यक्षपदासाठी भारतीय जनता पक्षातर्फे रंजना पाटील तर महाविकास आघाडीतर्फे शिवसेनेच्या रेखा राजपूत उमेदवार होत्या. अध्यक्षपदी भाजपच्या रंजना पाटील 34 मते मिळवून विजयी झाल्या तर पराभूत रेखा राजपूत याना 31 मते मिळाली. 


कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचा प्रत्येकी एक   असे दोन सदस्य फुटले,तर उपाध्यक्षपदाच्या निवडणूकीत भाजपचे लालचंद पाटील विजयी झाले. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जयश्री पाटील यांचा पराभव केला. विशेष म्हणजे भाजपचाही एक सदस्य गैरहजर होता.


जळगाव जिल्हा परिषदेत गेल्या 30 वर्षापासून भाजपची सत्ता आहे. यावेळी राज्यात सरकार बदलल्यामुळे जिल्हा परिषदेतही सत्ता बदल होण्याची शक्‍यता होती. मात्र कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचा सदस्य फुटल्यामुळे भाजपला आपली सत्ता कायम राखण्यात यश मिळाले आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT