jaan mohmmad.jpg
jaan mohmmad.jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

दाऊदच्या 'त्या' शत्रुला मारण्यासाठी जान मोहम्मद बहरीनला गेला होता

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने  (Delhi Police) पकडलेल्या दहशतवादी जान मोहम्म्द शेख  (Jaan Mohmmad Shaikh)संदर्भात मोठी माहिती समोर आली आहे. जान मोहम्मद याचे अंडवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (underworld don dawood ibrahim) सोबत संबंध आहेत.  २०१९ मध्ये दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय फहीम मचमच (Fahim Machmach) याने बहरीनच्या अली बुदेश (Ali Budesh) नावाच्या गुंडाला मारण्यासाठी जान मोहम्मदला सुपारी दिली होती. दाऊदच्या सांगण्यावरुन तो गुंड अली बुदेशची हत्या करण्यासाठी बहरीनला गेला होता.

इतकेच नव्हे तर दिल्ली पोलीसांनी पकडलेल्या दहशतवाद्यांचा दाऊद इब्राहिमचा भाऊ अनीस इब्राहिमशी संबंध असल्याचे दिल्ली पोलिसांनी आधीच सांगितले आहे. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाच्याही तो रडावर होता. दरम्यान याप्रकरणी महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथक(एटीएस) व गुन्हे शाखेचे एक पथक दिल्लीला रवाना झाले आहे. आरोपींबाबत अधिक माहिती घेण्यासाठी हे पथक तेथे गेले आहे.


दाऊदने छोटा शकीलला अली बुधेशला ठार मारण्याचे आदेश दिले होते आणि छोटा शकीलने फहीम मचमचकडे जबाबदारी सोपवली होती. तर फहीम मचमचने अली बुदेशला मारण्यासाठी जान मोहम्मदला पैसेही दिले होते. गुन्हे शाखेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तो काही दिवस बहरीनमध्ये राहिला, पण जेव्हा अलीने बुधेशची स्थिती पाहिली तेव्हा जान मोहम्मदला भीती वाटली की जर त्याने अलीचा खून केला तर तो भारतात परत जाऊ शकणार नाही. त्यानंतर जानने माघार घेतली.  गेल्या महिन्यात फहीम मचमचच्या मृत्यूनंतर जान मोहम्मद दाऊदचा भाऊ अनीस इब्राहिमच्या संपर्कात आला.

गुंड अली बुधेश आधी दाऊदसोबत काम करायचा, पण नंतर दाऊदच्या टोळीशी मतभेद झाल्यानंतर त्याने पाकिस्तानात दाऊदच्या शत्रूंशी हात मिळवला आणि बहरीनमध्ये राहू लागला. यानंतर अली बुधेशने दाऊदच्या टोळीशी संबंधित सर्व गुप्त माहिती पोलिसांना द्यायला सुरुवात केली.  त्यानंतर दाऊदने छोटा शकीलला अली बुधेशला संपवण्यास सांगितले. गँगस्टर अली बुधेश 80 च्या दशकात खूप सक्रिय होता, पण नंतर मुंबई पोलिसांच्या भीतीने 90 च्या दशकात परदेशात पळून गेला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT