biden8.jpg
biden8.jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

ज्यो बायडन विजयी झाले..पण फ्लोरिडात 'सातारा इफेक्ट' नाही..

सरकारनामा ब्युरो

फ्लोरिडा : राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या साताऱ्यातील भर पावसाच्या सभेनं महाराष्ट्रातील राजकीय समीकरणं बदलली होती. डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडन यांची अशीच एक सभा फ्लोरिडा येथे झाली होती. ही सभा इतिहास घडवेल का, याकडे अनेकांचे लक्ष होते. अमेरिकेच्या अध्यक्षपदी ज्यो बायडन यांची निवड झाली असली तरी फ्लोरिडा राज्यातील पावसातील सभेचा फारसा परिणाम झाला नसल्याचे दिसते. बायडन यांना फ्लोरियामध्ये 52 लाख 64 हजार 453 मते (47.9 टक्के) मिळाली तर डोनाल्ट ट्रम्प यांना 56 लाख 58 हजार 847 मते (51.2 टक्के) मिळाली आहेत.

शरद पवार यांच्या साताऱ्यातील भर पावसाच्या सभेनं महाराष्ट्रातील राजकीय समीकरणं बदलली. या घटनेची नोंद राजकीय इतिहासात ठळकपणे झालीच पण विरोधकांच्या स्वप्नांवरही पाणी फेरलं गेलं. या सभेनं लोकसभेच्या पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसलेंचा पराभव झाला. विधानसभा निवडणुकीतही राष्ट्रवादीला या सभेचा फायदा झाला. अशीच एक सभा अमेरिकेत झाली होती.  

 
फ्लोरिडा येथे डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडन यांच्या भाषणावेळी वादळी पाऊस सुरू झाला. पाऊस थांबत नव्हता. मात्र अशा पावसातही बायडन यांनी जोरदार भाषण केलं.. अन् उपस्थितांची मने जिंकली. यांचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. बायडन यांनीदेखील त्यांच्या ट्विटर हॅडलवरून सभेतील फोटो ट्विट केला होता. बायडन यांनी टि्वट करून हा फोटो शेअर केला आहे.  त्यांना म्हटल आहे की "हे वादळ जाईल आणि नवा दिवस येईल"    
 
अमेरिकेमध्ये व्हाइट हाऊससाठीच्या उत्कंठावर्धक शर्यतीत डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडेन हे अखेर विजयी ठरले आहेत. त्यांनी मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केला आहे. ट्रम्प यांचे दुसऱ्या टर्मचे स्वप्न बायडेन यांनी धुळीस मिळवले आहे. अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सलग दुसरी टर्म न भूषवणारे डोनाल्ड ट्रम्प हे मागील 30 वर्षांतील पहिले अध्यक्ष ठरले आहेत. 

मतमोजणीच्या चौथ्या दिवशीही काल निकालाचा सस्पेन्स कायम होता. बायडेन यांना अखेर 274 इतकी इलेक्टोरल मते मिळाली असून, ट्रम्प यांची गाडी २१४ मतांवरच थांबली आहे. राजकीयदृष्या अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या पेनसिल्व्हानियातील २० इलेक्टोरल मते बायडेन यांच्या बाजूने पडल्याने त्यांनी सहज बहुमताचा म्हणजे २७० चा आकडा गाठला. जॉर्जिया,आणि नेवाडा या राज्यांमध्ये बायडेन यांनी आघाडी घेतली होती. या राज्यांमध्ये शुक्रवारीही मतमोजणी सुरूच होती. राष्ट्रीय पातळीवर मतांच्या बाबतीत बायडेन यांनी ट्रम्प यांच्यावर मोठी आघाडी घेतली आहे. पेनसिल्व्हानियामध्ये बायडेन यांनी जोरदार मुसंडी मारली होती. 
 
बायडेन यांची अध्यक्षपदी आणि उपाध्यक्षपदी कमला हॅरीस यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबंध चांगले होते. आता त्यांचा पराभव झाल्याने आगामी काळात भारत आणि अमेरिका संबंध कशाप्रकारे कायम राहतात हे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

 Edited  by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT