मुख्य बातम्या मोबाईल

गोपीनाथ मुंडेंपासून सावता परिषदेचे काम करणारे कल्याण आखाडे राष्ट्रवादीत दाखल

दत्ता देशमुख

बीड : सावता परिषदेच्या माध्यमातून माळी समाजाचे संघटन करुन दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्यापासून भाजपसोबत काम करणाऱ्या कल्याण आखाडे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. लातूर जिल्ह्यात शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा करुन गेवराईतील सभेत आखाडे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

कल्याण आखाडे यांना महामंडळावर घ्यावे अशी अपेक्षा हेाती. लोकसभा निवडणुकीत घेतलेल्या मेळाव्यात त्यांच्यासह समर्थकांनी ही खंत जाहीर बोलून दाखविली होती. यानंतर झालेल्या भाषणात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंनीही लवकरच सन्मान होईल असा शब्द दिला होता. मात्र, आचारसंहितेपूर्वी भाजपच्या काही समर्थकांच्या महामंडळावर नेमणूका झाल्या. परंतु, कल्याण आखाडे उपेक्षित राहील्याने ते नाराज होते.

सावता परिषदेच्या माध्यमातून माळी समाजाचे संघटन करुन ते भाजपसोबत काम करत होते. संत सावता महाराजांचे समाधीस्थान अरणला ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत मेळावे घेऊन त्यांनी या तिर्थक्षेत्राच्या विकासाचाही प्रयत्न केला. त्याकाळी राष्ट्रवादीतील जेष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या समता परिषदेला ‘काऊंटर’ म्हणून भाजपानेही या संघटनेला बळ दिले होते. परंतु, सरकार येऊन सत्तेच्या काळात कुठलाच मान न मिळाल्याने श्री. आखाडे नाराज होते. त्यामुळे त्यांनी भाजपची साथ सोडून राष्ट्रवादीची वाट धरली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT