मुख्य बातम्या मोबाईल

कणकवलीच्या तहसीलदाराला ACB ने पकडले  

सरकारनामा ब्युरो

कणकवली (सिंधुदुर्ग) : दाखल्यांसाठी आठ हजारांची लाच घेताना येथील तहसीलदारासह लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज पकडले.

ही कारवाई सकाळी साडेअकराच्या सुमारास तहसील कार्यालयात करण्यात आली. पकडलेल्यांमध्ये तहसीलदार संजय पावसकर (वय 57) आणि लिपिक नीलेश कदम (34) यांचा समावेश आहे.

या कारवाईबाबत या विभागाने दिलेली माहिती अशी : एका लाकूड व्यावसायिकाकडून झाड तोडण्यासाठी आवश्‍यक असलेले मालकी हक्‍काचे दाखले देण्यासाठी तहसीलदार आणि लिपिकाने रकमेची मागणी केली होती. लाकूड व्यावसायिकाने सोमवारी (ता. 24) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार आज सापळा रचण्यात आला. यात तहसीलदार पावसकर सहा हजार, तर लिपिक कदम दोन हजार रुपयांची लाच घेताना सापडले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT