मुख्य बातम्या मोबाईल

कर्नाटकच्या राज्यपालांनी एकनिष्ठतेमध्ये कुत्र्यालाही मागे टाकले : संजय निरुपम

सरकारनामा ब्युरो

पुणे : कर्नाटकचे राज्यपाल वजूभाई वाला यांच्यावर टीका करताना मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी आज हीन पातळी गाठली. 

`एकनिष्ठा दाखवण्यात राज्यपाल वाला यांनी कुत्र्यालाही मागे टाकले,' अशा आशयाचे ट्विट निरुपम यांनी आज सायंकाळी केले. 

कर्नाटकमध्ये झालेल्या राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे ट्विट केले आहेत. त्यात त्यांनी म्हटले आहे, की वजूभाई वाला मनुष्य आहेत. मी त्यांना कुत्रा कसे बनवणार? एकनिष्ठ हा मनुष्य स्वभावाचा सर्वोत्कृष्ट गुण आहे. ही एकनिष्ठा दाखवण्यात वाला यांनी कुत्र्यालाही मागे टाकले आहे. माझ्या या म्हणण्यामुळे वाईट वाटत असेल, तर मला माफ करा. 

राज्यपालांनी लोकशाहीची हत्या करण्यात कोणतीही कसूर सोडलेली नाही. त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यायला हवा, असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.  


 

 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT