2kim_yo_jong_ff.gif
2kim_yo_jong_ff.gif 
मुख्य बातम्या मोबाईल

किम यांच्या बहिणीने लष्कराला दिले 'हे 'अधिकार

वृत्तसंस्था

सोल : उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन यांची बहिण किम यो जोंग यांनी दक्षिण कोरियावर लष्करी कारवाई करण्याची धमकी दिली आहे. यामुळे दोन्ही देशातील वातावरण तापले आहे. दक्षिण कोरियासोबत सीमेवर बिघडलेले संबंध हे त्याला प्रमुख कारण असल्याचे समजले जाते. या बिघडलेल्या संबधामुळे किम यो यांनी दक्षिण कोरियावर शाब्दिक हल्ला चढविला आहे. 

अनेक वर्षापासून दक्षिण कोरिया व उत्तर कोरिया यांच्यात शत्रूत्व आहे. दक्षिण कोरियाने उत्तर कोरियाशी संबध ठेवण्यास अर्थ नाही, असे जाहीर केल्यापासून किम यो जोंग या भडकल्या आहेत.  उत्तर कोरियाविरोधातील सीमेवर पत्रके फेकणाऱ्यांविरोधात काहीही कारवाई न केल्याबद्दल त्यांनी  दक्षिण कोरियावर रविवारी टीकास्त्र सोडले.  

उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन आणि दक्षिण कोरियाचे राष्टाध्यक्ष मून जेई इन यांच्यात २०१८ मध्ये  झालेल्या तीन बैठकीतमध्ये सीमेवर संपर्क कार्यालय स्थापन करण्यात आले होते.  पण काही काळानंतर किम यो यांनी सांगितले होते की दक्षिण कोरियाने विरोध रोखला नाही तर दोन्ही देशांत झालेला करार रद्द करण्यात येईल.  किम यो जोंग या  सत्ताधारी वर्कर्स पार्टीच्या केंद्रीय समितीच्या उपाध्यक्षा आहेत. 

उत्तर कोरियाने अण्वस्त्रनिर्मिती सोडून देण्यासाठी किम जोंग उन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची तीन वेळा भेट झाली होती. यात सविस्तर चर्चा झाल्यानंतरही काही महिन्यापासून उत्तर कोरियाने दक्षिण कोरियासोबत कोणत्याही प्रकारचे व्यवहार करण्यावर बंदी घातली आहे. किम यो जोंग म्हणाल्या की यापुढे दक्षिण कोरियावरील कारवाईचा निर्णय मी आमच्या लष्कराकडे सोपविला आहे.  दक्षिण कोरियाबाबतच्या जनतेच्या भावना लक्षात घेऊन आमचे सैन्यही निश्‍चितच कारवाई करेल.  कठोर कारवाई करण्याची परवानगी आमच्या सैनिकांना  दिली आहे.  


हेही वाचा : आता 'या' आजाराच्या उपचारासाठी मेडिक्लेम करता येणार..  


पुणे : मेडिक्‍लेम पॉलिसी विमाधारकासाठी एक गुड न्यूज आहे. पॅालिसीधारकांना आता कोरोना उपचारासाठीही क्लेम करता येणार आहे.   भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने याबाबतच्या  सूचना नुकत्याच दिल्या आहेत. तुमचा कोरोना तपासणीचा अहवाल जर  पॅाझिटिव्ह आला. तर तुम्हाला कोरोना उपचारासाठीही मेडिक्लेम पॅालिसीचा उपयोग होऊ शकतो. या आदेशामुळे कोरोनाबाधित मेडिक्लेम पॅालिसीधारकांना दिलासा मिळाला आहे. कोरोनाचा उपचार घेत असताना तुमचा जो खर्च झाला असेल त्याच्या परताव्यासाठी क्लेम करता येणार आहे, असे ग्राहक पंचायत न्यायप्राधिकरणाचे अध्यक्ष श्रीकांत जोशी यांनी स्पष्ट केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT