congres, shivsena, ncp.jpg
congres, shivsena, ncp.jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

नगरमध्ये तिनही पक्षांच्या जिल्हाध्यक्षांत समन्वयाचा अभाव, निवडी रखडल्या

राजेंद्र सावंत

पाथर्डी : राज्यात महाआघाडीचे सरकार स्थापन होवुन दोन वर्षे होत आले आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ व महाआघाडीतील शिवेसना, राष्ट्रवादी व इंदिरा काँग्रेस तिन्ही पक्षाचे जिल्हाध्यक्ष यांच्यात समन्वयाअभावी जिल्हा स्तरीय व तालुका पातळीवरील शासकीय विविध समित्यांचे अध्यक्ष व सदस्यांच्या निवडी होवु शकल्या नाहीत. त्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यामधे नाराजीचा सुर आहे. (Lack of coordination among district presidents of all the three parties in the town, elections stalled)

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व महसूलमंत्री यांनी लक्ष घालुन समित्यांच्या पदाधिका-यांच्या निवडी जाहीर कराव्यात, अशी मागणी तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.

राज्यात महाआघाडीचे सरकार येवुन पावणेदोन वर्षाचा कालावधी लोटला आहे. जिल्हा तालुका स्तरावरील विविध शासकिय समितीचे अध्यक्ष व अशासकिय सदस्य यांच्या निवडी अद्याप झालेल्या नाहीत. संजय गांधी निराधार योजना समिती, अंगणवाडी सेविका निवड समिती, नगरपरीषद दक्षता समिती, राज्य विद्युत मंडळ सल्लागार समिती, कृषी विभागाची आत्मा समिती, रोजगार हमी समिती, सार्वजनिक वितरण व्यवस्था समिती, दुष्काळ निवारण समिती व इतर समितीच्या अध्यक्ष व सदस्य निवडी झाल्या नाहीत. सुरुवातीला समितीचे अध्यक्ष व सदस्य निवडीचा फाँर्म्युला कळविण्यात आला होता.

जेथे ज्या पक्षाचा आमदार असेल, तेथे त्यांचे अध्यक्ष व सदस्य निवडीसाठी साठ, विस, विस असा फाँर्म्युला ठरला होता. त्यानुसार कार्यकर्त्यांच्या याद्या मागविण्यात आल्या होत्या. त्यानंतर राज्याच्या स्तरावरुन पुन्हा धोरणात बदल करुन तिन्ही पक्षासाठी तेहतीस टक्के जागा देण्याचा नवा फाँर्म्युला आला. पुन्हा स्थानिक नेत्यांकडुन कार्यकर्त्यांच्या नावाच्या शिफारशी मागविल्या त्याही देण्यात आल्या.

शिनेसनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र दळवी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, काँग्रसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांनी एकत्रीत बसून अंतीम याद्या निश्चित करुन पालकमंत्र्याकडे देणे अपेक्षीत होते. तिन्ही पक्षाचे जिल्हाध्यक्ष व पालमंत्री यांच्यात याबाबत चर्चा झाली, पण बैठक झाली नाही.

सरकारचे दोन वर्षे संपले तरीही कार्यकर्ते वाऱ्यावरच आहेत. समित्यांचे कामेही प्रभावीपणे होत नाहीत. राज्य पातळीवर उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी लक्ष घालुन समित्यांच्या निवडी कराव्यात, अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे.

सरकारच्या विविध समित्यांसाठी आम्ही याद्या दिल्या आहेत. दोन वेळा याद्या बदलुन दिल्या, मात्र अद्याप नियुत्या झाल्या नाहीत. महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे पक्षाच्या बैठकीत पाठपुरावा केला आहे. यांनी पंधरा दिवसात निवडी करण्यात येतील, असे सांगितले आहे. कार्यकर्त्यांना कामाची संधी मिळेल व जनतेची रखडलेली कामे होती

- नासीर भाई शेख, तालुकाध्यक्ष, काँग्रेस पक्ष, पाथर्डी.

हेही वाचा..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT