2Sarkarnama_20Banner_20_202021_06_03T130328.354.jpg
2Sarkarnama_20Banner_20_202021_06_03T130328.354.jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

परिवहनमंत्री अनिल परब यांच्या अडचणीत वाढ..चैाकशीचे आदेश 

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने त्यांच्या चैाकशीचे आदेश दिले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात समुद्र किनारी बेकायदा जमिन खरेदीप्रकरणी अनिल परब यांची चैाकशी होणार आहे. समुद्र किनारपट्टीचे नियम न पाळता त्यांनी ही जमिन खरेदी केली असल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. land case in Ratnagiri Ministry of Environment orders inquiry Of State Minister Anil Parab

भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी, गिरीश बापट आणि मनोज कोटक यांनी याबाबतची तक्रार केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे केली होती. त्यानंतर मंत्रालयाने परब यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

अनिल परब यांनी मुरुड येथे रिसॉर्ट बांधण्यासाठी सुमारे 4 हजार 250 चौरस मीटर जमीन खरेदी केली आहे. त्यावेळी तेथे कोणतेही बांधकाम नव्हते. तसेच रस्ता पण नव्हता. त्यावेळी परब यांनी ही जाग बिगरशेती करुन घेण्यासाठी माझ्याकडून संमतीपत्र घेतले. तसेच त्या जमिनीचे मालक ते असल्याचे सांगितले, असे जमिनिचे मालक विभास साठे यांनी सांगितले. 
 
रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचा सविस्तर अहवाल देण्याचे आदेश आम्हाला दिले आहेत, अशी महिती महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथोरिटीचे संचालक नरेंद्र टोके यांनी दिली. अनिल परब यांनी ही जागा कोस्टल झोनमध्ये कशी करून घेतली, याच्या चौकशीचे आदेश महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथोरिटीने दिले आहेत.

"मी त्याची गर्लफ्रेंड नाही.." तो 'राज' म्हणून भेटला होता..'मिस्ट्री गर्ल'चा नवीन खुलासा.. 
नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बॅंक गैरव्यवहारातील आरोपी, हिऱ्यांच्या व्यापारी मेहुल चोकसी प्रत्यार्पण प्रकरणात त्याच्या गर्लफ्रेंडबाबतही चर्चा काही दिवसापासून रंगली आहे. यात बारबरा जबरिका हि त्यांची गर्ल फ्रेंड असल्याचे वृत्त काही दिवसापूर्वी आले होते. आता बारबरा जबरिका हीने त्यांच्या नातेसंबधाबाबत स्वतः खुलासा केला आहे. एनआयए या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे.  "मी अनेक वेळा याबाबत स्पष्ट सांगितले आहे की मी त्याची गर्लफ्रेंड नाही. आमची भेट झाली तेव्हा त्याने मला त्याचे नाव 'राज' असल्याचे सांगितले होते.  माझ्या जवळ स्वतःचा उद्योग - व्यवसाय आहे. मला त्याच्या पैशांची, मदतीची, हॅाटेल बुकिंग, दागिन्यांची गरज नाही," असे बारबरा हीने स्पष्ट केले आहे. मेहुल चोकसी अपहरण प्रकरण खोटे असल्याचेही तिने सांगितले. त्याने मला हिऱ्याचे दागिने दिले होते. ते बनावट होते, असेही तिने सांगितले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT