Latif-Tamboli. 
मुख्य बातम्या मोबाईल

राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाच्या सरचिटणीसपदी लतीफ तांबोळी

सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ओ.बी.सी विभागाचे जिल्हाध्यक्ष लतीफ तांबोळी यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी विभागाच्या सरचिटणीसपदी निवड करण्यात आल्याचे पत्र राज्यध्यक्ष ईश्वर बाळबुध्दे यांनी दिले.

हुकूम मुलाणी

मंगळवेढा: सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ओ.बी.सी विभागाचे जिल्हाध्यक्ष लतीफ तांबोळी यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी विभागाच्या सरचिटणीसपदी निवड करण्यात आल्याचे पत्र राज्यध्यक्ष ईश्वर बाळबुध्दे यांनी दिले. त्यांच्या निवडीबद्दल आमदार भारत भालके यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी तालुकाध्यक्ष सुनील डोके, डोके, भारत बेदरे,अशोक माने उपस्थित होते. त्यांच्या निवडीनंतर
दुष्काळी तालुक्यातील चळवळीतील कार्यकर्त्याला राज्य स्तरावर काम करण्याची संधी मिळाल्याने आनंद व्यक्त केला जात आहे.   

तालुक्यातील मरवडे गावच्या सरपंच पदापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून ग्राम शाखाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष सह, जिल्हा अल्पसंख्याक अध्यक्ष, ओबीसी जिल्हाध्यक्ष, आदी पदावर त्यांनी यापूर्वी काम केले आहे. याशिवाय सरपंच, पंचायत समिती स्तरावर देखील जनतेच्या विकासाची कामे केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्या मार्गदर्शनाखाली एक प्रभावी वक्ता म्हणून उदयास आले. गत पाच वर्षात विरोधी पक्ष म्हणून  काम करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ध्येयधोरणे ग्रामीण भागातील जनतेला व पवार साहेबांचे विचार अल्पसंख्यांक समाजामध्ये पोहोचण्यासाठी व तत्कालीन भाजप-शिवसेना सरकारच्या निष्क्रिय कामगिरीचा कामगिरीबाबत जनतेचे प्रबोधन व्हावे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघर्ष महाराष्ट्राच्या सात विभागातून काढलेल्या संघर्ष यात्रेत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, मंत्री धनंजय मुंडे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अमोल मिटकरी,
महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, यांच्या सोबतीने संघर्ष यात्रेत सहभाग नोंदवला. या यात्रेत त्यांनी पक्षाचे विचार व पक्षाची ग्रामीण भागातील शेतकऱ्याविषयी तळमळ लोकांसमोर भाषणाच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडली. 


 

हेही वाचा :  राज्यातील जनता विचारणार राज्यपालांना प्रश्‍न


पुणे : इतर देशांप्रमाणे शेतकरी, कष्टकरी व मोलमजुरी करणाऱ्या जनतेच्या खात्यात थेट 15000 रुपये जमा करण्याची शिफारस राज्यपालांनी केंद्र सरकारला करावी. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना कोणती औषधे दिली व कोणते उपचार केले, ते जनतेसाठी अधिकृतपणे जाहीर करावे. कोरोनाच्या संकट काळात राज्यपालांनी जनतेसाठी नेमके काय काम केले, याचा अधिकृत अहवाल प्रसिद्ध करावी. सात मागण्यांसाठी सोमवारी (ता. 22) किसान आर्मी व वॉटर आर्मीचे संस्थापक नेते प्रफुल्ल कदम यांच्या नेतृत्वाखाली थेट राज्यपालांना फोन करण्याचे आंदोलन होणार आहे. या आंदोलनात सुरुवातीलाच सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील अनेक गावांनी व विविध संघटनांसह राज्यभरातील अनेक लोकांनी सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हे फोन आंदोलन राज्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण होणार आहे. सांगली जिल्हा संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, सातारा जिल्हा प्रहार संघटना, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ सोलापूर जिल्हा, जत तालुका वंचित बहुजन आघाडी, भारिप बहुजन महासंघ तसेच सोलापूर जिल्ह्यातील यलमार मंगेवाडी, वाकी घेरडी, वाटंबरे, हटकर मंगेवाडी आदी अनेक गावांनी या फोन आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT