Navab Malik.jpg
Navab Malik.jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

सर्वसामान्यांमध्ये जाताना दोन्ही विरोधी पक्षनेत्यांना नवीन बूट घ्यावे लागतात : नवाब मलिक

सरकारनामा ब्युरो

मुंबई : सर्वसामान्य लोकांमध्ये जाताना राज्याच्या दोन्ही विरोधी पक्षनेत्यांना नवीन बूट खरेदी करावे लागतात, यासारखे आश्चर्य नाही, अशी खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Navab Malik) यांनी केली. (Leaders of both the Opposition have to wear new shoes when going for general: Nawab Malik)

तोक्ते वादळाने कोकणात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्याची पाहणी करण्यासाठी राज्याचे दोन्ही विरोधी पक्षनेते कोकणच्या दौर्‍यावर होते. 

या वेळी प्रसिद्ध झालेल्या फोटोत दोन्ही विरोधी पक्षनेते एकसारखे नवीन बूट घातलेले दिसत आहेत. त्यामध्ये त्यांनी 'नायकी'चे की 'पूमा' चे बूट घातलेत, हे माहित नाही, परंतु फोटोत मात्र एकसारखेच बूट दिसत आहेत, असा उपरोधिक टोला नवाब मलिक यांनी लगावला आहे.
 

हेही वाचा...

दूध धंद्यातून दरमहा दोन लाखांची कमाई 

श्रीगोंदे : कष्टासोबत आधुनिकता व त्यास नियोजनाची जोड दिल्यास दूधव्यवसायातून दरमहा लखपती होता येते, हे काष्टी येथील ज्ञानदेव पाचपुते यांनी कृतीतून दाखवून दिले आहे. दुभत्या पन्नास म्हशी, तीस रेड्यांसाठी मुक्त गोठा व नियोजनबद्ध पद्धतीने 55 रुपये लिटरने विकले जाणारे दूध, यातून ते दरमहा दोन लाखांचा निव्वळ नफा काढत असल्याचा दावा करीत आहेत. 

काष्टी येथील साईसेवा पतसंस्थेचे अध्यक्ष पाचपुते म्हशींच्या गोठ्यात पत्नी जयश्री व मुलगा रोहित यांच्यासह जातीने लक्ष देतात. एक म्हैस विकत घेतली व दूध धंदा आवडीखातर सुरू केला, असे सांगत पाचपुते म्हणाले, ""आज दुभत्या पन्नास म्हशी, तीस रेडे आहेत. रेड्यांसाठी मुक्त गोठा केला आहे. दूध धंदाही आता नियोजनबद्ध व आधुनिक पद्धतीने केला तरच परवडतो. शेतकऱ्यांनीही बदलले पाहिजे, असे मनाला पटवीत या धंद्यात उडी घेतली.'' 

""म्हशींच्या देखरेखीसाठी पाच ते सात मजूर ठेवले आहेत. येथील पाण्यात क्षार असल्याने, म्हशींना पिण्याचे पाणीही फिल्टरचे देतो. स्वच्छता, विजेचा प्रश्न सोडविण्यासाठी गोठ्याच्या वरच्या बाजूला सौरऊर्जा प्रकल्प उभारला आहे. महिन्याचे खाद्य एकदाच घेतो. सध्या बाजारात दुधाचा दर कितीही असला, तरी आम्ही 55 रुपये लिटरने दूध देतो; मात्र ते ग्राहकाला समाधान देणारे असते. त्यामुळे रोज निघणारे साधारण पाचशे लिटर दूध हातोहात विकते. तूप, पनीर, दही यांचीही थोड्या प्रमाणात निर्मिती करून गावातच विक्री करतो,'' असे त्यांनी सांगितले. 

शेणखतातूनही दहा-बारा लाखांचे उत्पन्न 

ज्ञानदेव पाचपुते यांनी गोठ्यासाठी सुमारे एक कोटी रुपयांची गुंतवणूक केली. दरमहा पाच लाखांपर्यंत खर्च वजा जाता, दोन लाखांचा निव्वळ नफा मिळतो. शिवाय, म्हशींच्या खताचे वर्षाला दहा ते बारा लाख रुपये मिळतात. हा नफा वर्षाच्या जमा-खर्चात धरला जातो, असे ते म्हणाले. 

हेही वाचा...

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT