Rajiv Gandhi
Rajiv Gandhi 
मुख्य बातम्या मोबाईल

राजीव गांधी यांना परिवारासह नेते कार्यकर्त्यांची आदरांजली

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली - दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना त्यांच्या 74 व्या जयंतीनिमित्त गांधी कुटुंबियांसह विविध काँग्रेस नेत्यांनी आदरांजली अर्पण केली. नवी दिल्ली येथील स्मृती स्थळ येथील वीरभूमी येथे आज सकाळपासूनच नेते कार्यकर्त्यांची रिघ लागली होती. 

कै. राजीव यांचे पूत्र व काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि राजीवजींच्या कन्या प्रियंका वद्रा- गांधी यांनी वीरभूमी येथील समाधीवर पुष्प अर्पण करुन राजीवजींना आदरांजली अर्पण केली. 

राहुल गांधी यांनी ट्वीटरवरुनही आपल्या पित्याला आदरांजली अर्पण केली आहे. 'राजीव गांधी हे अत्यंत स्नेहशील आणि हवेहवेसे वाटणारे व्यक्तीमत्त्व होते. त्यांच्या अकाली निधनाने माझ्या जीवनात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ते हयात असताना त्यांच्याबरोबर घालवलेले दिवस, साजरे केलेले वाढदिवस मला अजूनही आठवतात. त्यांच्या स्मृती चिरंतर राहतील.' अशा शब्दात राहुल गांधी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

प्रियंका वद्रा-गांधी यांनी ट्वीटरवरुन कै. राजीव यांचे एक विधान देत त्यांनी बाळगलेल्या ध्येयाला सलाम केला आहे. 
'मी तरुण आहे आणि माझ्यासमोर एक स्वप्न आहे. हे स्वप्न आहे भारताला स्वयंपूर्ण, बलवान आणि अन्य देशांच्या रांगेतले आघाडीचे राष्ट्र बनवायचे आहे- राहुल गांधी' असे ट्वीट प्रियंका यांनी केले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT