मुख्य बातम्या मोबाईल

आर्थिक मदत सोडा, निदान ओला दुष्काळ जाहीर करा : भातखळकर 

सरकारनामा ब्युरो

मुंबई : पूरग्रस्तांना मदत जाहीर न करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निदान ओला दुष्काळ तरी जाहीर करायला हवा होता. त्यामुळे सरकारी यंत्रणा हलली असती व मदत देण्यास सुरुवात तरी झाली असती, अशी टीका भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी आज केली.

मदत इतक्‍या लवकर जाहीर करणार नाही, असे ठाकरे यांनी आज सोलापूर दौऱ्यात सांगितले; मात्र आता पूर येऊन आठ दिवस झाले आहेत.

निदान मुख्यमंत्र्यांनी ओला दुष्काळ व नजर पंचनामे जाहीर केले असते तर त्या निकषांनुसार पुढील कार्यवाही झाली असती. त्याप्रमाणे सरकारी यंत्रणेने तात्पुरते निवारे, वीजपुरवठा आदी कामे सुरू केली असती, असेही भातखळकर यांनी दाखवून दिले.

स्वतः मदत जाहीर करण्याऐवजी ठाकरे केंद्राकडे मदत मागत आहेत; पण राज्याने मदत दिली तर त्यानुसार केंद्र सरकार मदत देते. आमच्याकडे पैसे नाहीत म्हणून मदत देणार नाही, असे राज्य सरकार म्हणत आहे; मात्र राज्य सरकारकडे पैसे नाहीत असे कधीच होत नाही. निदान राज्य सरकारने ठरलेल्या निकषांनुसार केंद्राला अहवाल पाठवावा. त्यानुसार केंद्र सरकार दुष्काळग्रस्त भागांच्या पाहणीसाठी पथक पाठवेल, असेही भातखळकर यांनी दाखवून दिले. 


मेट्रोच्या अनेक फेऱ्या रिकाम्याच!

लॉकडाऊनमुळे गेल्या सात महिन्यांपासून बंद असलेली मुंबईची मेट्रो आजपासून प्रवाशांच्या सेवेकरीता सुरू झाली. मात्र सप्ताहाचा पहिला दिवस असूनही स्थानकांवर तुरळक गर्दी दिसून येत होती. आज सकाळी घाटकोपर मेट्रो स्थानकातून 8.30 वाजताच्या सुमारास घाटकोपरहून वर्सोवाला पहिली गाडी सोडण्यात आली. त्यात केवळ 12 प्रवासी होते. त्यामुळे पहिल्याच दिवशी प्रवाशांचा हवा तसा प्रतिसाद न मिळाल्याने मेट्रो रिकाम्याच धावत असल्याचे चित्र होते.

सोमवारी दिवसभरात रात्रीपर्यंत मेट्रोच्या एकूण 300 फेऱ्या नियोजित होत्या. सध्या मेट्रोत केवळ 300 प्रवाशांना प्रवेश देण्यात येणार आहे. दुपारपर्यंत घाटकोपर मेट्रो रेल्वेस्थानकातून एकूण 100 प्रवाशांनी प्रवास केला. प्लास्टिक टोकन ऐवजी क्‍युआर पेपर तिकीट, स्मार्ट कार्ड, डिजिटल तिकीट यांचा वापर करण्यात येत होता. तसेच प्रवाशांना मास्क घालणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे बंधनकारक करण्यात आले होते.

 प्रवेशद्वारावरच प्रवाशांकरीता सतत सूचना आणि प्रोटोकॉलची माहिती देण्यात येत होती. कोव्हिडची लक्षणे दिसून आल्यास काही प्रवाशांना प्रवेश नाकारण्यात येत होता. स्थानकांच्या सुरक्षेत वाढ करून, सुरक्षा रक्षकांकडून प्रत्येक प्रवाशांची थर्मल चाचणी करण्यात येत होती. प्रवाशांना सॅनिटाझरची सोय उपलब्ध करण्यात आली 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT