Anna Bhau Sathe.jpg
Anna Bhau Sathe.jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

दीडशे आमदार आणि 20 खासदारांचे पत्र.. 'अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न द्या..'

संपत मोरे

पुणे : ''लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा म्हणून राज्यातील 150 आमदार आणि 20 खासदारांनी पत्रे दिली आहेत. राज्यभरात अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा म्हणून मोठी चळवळ उभी राहिली आहे. त्यामुळे त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी केंद्र सरकार सकारात्मक विचार करेल," असा विश्वास दलित युवक आंदोलनाचे अध्यक्ष सचिन बागडे यांनी व्यक्त केला आहे.

"लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा योग्य तो सन्मान व्हावा, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील शेकडो कार्यकर्ते राबत आहेत. आता त्यांच्या कार्याला न्याय मिळाला पाहिजे, म्हणून शहरापासून खेड्यापर्यँत चळवळ उभी राहिली आहे," असे बागडे म्हणाले.

बगाडे म्हणाले, "आतापर्यंत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, आमदार सुनील शेळके आमदार अशोक पवार आमदार दिलीप मोहिते, आमदार सुनील कांबळे, आमदार संजय कुटे, आमदार भीमराव तापकीर, आमदार विनय कोरे, आमदार दिलीप बनकर, आमदार सुधीर तांबे, आमदार अमोल मिटकरी, आमदार भाई जगताप, आमदार अनिल बाबर, आमदार चेतन तुपे, आमदार अतुल बेनके यासह 150 आमदारांनी अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न द्यावा, अशी मागणी केली आहे. खासदार संजय पाटील, खासदार राहुल शेवाळे, खासदार नवनीत राणा, खासदार जयसिद्धेश्वर स्वामी, खासदार सदाशिव लोखंडे, खासदार धनंजय माने, खासदार ओमराजे निंबाळकर, खासदार सुजय विखे यांनीही अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न द्यावा, अशी मागणी केली आहे."

"अण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार द्यावा," अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलेल्या पत्रामध्ये रामदास आठवले यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार द्यावा," अशी मागणी केली आहे. महाराष्ट्रातील अनेक आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून "अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा,"अशी मागणी केली आहे.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी कथा, कादंबरी, प्रवासवर्णन, पोवाडे, लावण्या या माध्यमातून मोठ्या प्रमाणात साहित्य निर्मिती केली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईमध्ये अण्णा भाऊ साठे यांचे मोठे योगदान होते. अण्णाभाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईमध्ये हातामध्ये डफ घेऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दौरा करून संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासाठी लोकांना जागृत केले होते. त्यांची "माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होतीय काहिली." ही लावणी त्या काळामध्ये गावोगावी पोहोचली होती. 
Edited  by : Mangesh Mahale 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT