मुख्य बातम्या मोबाईल

लोकसभेच्या तारखा मार्चच्या पहिल्या आठवड्यात ?

वृत्तसंस्था

नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागल्याने राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरवात केली आहे. यादरम्यान लोकसभा निवडणुकीच्या तारखा निवडणूक आयोग मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर करू शकते, अशी शक्‍यता वर्तविली जात आहे. या निवडणुका सहा ते सात टप्प्यांत होण्याची शक्‍यता सूत्राने वर्तविली आहे. 

सध्याच्या लोकसभेचा कार्यकाल हा 3 जून रोजी संपणार आहे. मे महिन्यातच निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे. गेल्या वेळी लोकसभेची निवडणूक 2014 मध्ये 9 टप्प्यांत 7 एप्रिल ते 12 मे दरम्यान झाली होती. मात्र देशात किती टप्प्यांत निवडणुका घ्यायच्या, याबाबतचा निर्णय अंतिम टप्प्यात आला आहे.

 सुरक्षा दलाच्या उपलब्धतेनुसार मतदानाच्या टप्प्याचा निर्णय घेतला जाणार आहे. याशिवाय लोकसभा निवडणुकीबरोबरच आंध्र प्रदेश, ओडिशा, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुका घेण्याचा विचार केला जात आहे. तसेच जम्मू- काश्‍मीरमध्येही निवडणूक घेण्याबाबत विचार सुरू आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT