मुख्य बातम्या मोबाईल

छगन भुजबळ म्हणाले, "पिचडसाहेब गेट वेल सुन' 

सरकारनामा ब्युरो

नाशिक ः माजी आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड सध्या मुंबईच्या लिलावती रुग्णालयात उपचार घेत आहेत. आज राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपुस केली. यावेळी भुजबळ म्हणाले, "पिचड साहेब गेट वेल सुन'. 

पिचड यांच्या प्रकृतीची विविध राजकीय नेत्यांनी विचारपुस केली. भुजबळ यांनी आवर्जून लिलावती हॉस्पिटल येथे भेट दिली. आदिवासी मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी पिचड झारखंड येथे गेले होते. परतीच्या प्रवासात श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ उपस्थित होते. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT