Girish Mahajan  .jpg
Girish Mahajan .jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

चाळीसगावमध्ये ढगफुटी; महाजनांची राज्य सरकारकडे महत्त्वाची मागणी    

सरकारनामा ब्यूरो

जळगाव : चाळीसगाव (Chalisgaon) तालुक्यात ढगफुटी झाल्याने मुसळधार पाऊस (Heavy rain) पडला. या मुळे तीतुर आणि डोंगरी नदीला पूर आला. तसेच कन्नड घाटात दरड कोसळली यामुळे रस्ता बंद झाला आहे. तर पुरामुळे पंधरा गावांना तडाखा बसला. सर्वाधिक  तडाखा-चाळीसगाव शहरासह वाकडी, वाघडू, हिंगोणे, खेर्डे, मुंदखेडे खुर्द, रोकडे, बोरखेडा खुर्द, पातोंडा, ओझर, टाकळी प्र.चा. या गावांना बसला आहे. या सर्व गावांमधील शेकडो गुरे व वाहने पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. (Mahajan made this demand to the state government) 

डोंगरी नदीच्यापुरामुळे चाळीसगावमधील बाजार पेठेचे मोठे नुकसान झाले आहे. चाळीसगावातील रिंगरोडवर गुडघाभर पाणी आहे. यामुळे दुकानामधील साहित्य पूर्णपणे खराब झाला आहे. अजूनही आजूबाजूच्या गावांचा संपर्क तुटलेला आहे.

वाकडी गावात डोंगरी नदीच्या पुरामुळे गुरे वाहून गेली आहेत. गावामधील अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. या गावातील शेकडो हेक्टरवरील पिके वाहून गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीची पाहणी भाजप नेते गिरीश महाजन यांनी केली. यावेळी त्यांनी चाळीसगाव तालुक्यातील पूरग्रस्तांना पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांप्रमाणे मदत देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. यावेळी खासदार उन्मेष पाटील, आमदार मंगेश चव्हाण हेही उपस्थित होते.    

दरम्यान, कन्नड-चाळीसगांव घाटात पाच ठिकाणी दरड कोसळ्यामुळे औरंगाबाद-धुळे महामार्गावरील वाहतूक गेल्या चोवीस तासांपासून ठप्प झाली आहे. कन्नड-चाळीसगांव घाटात काल रात्री दहा वाजेपासून वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. साधरणता साडेचार किलोमीटर पर्यंत या रांगा असल्याचे सांगितले जाते.

घाटातील वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू असून जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देऊन मदतकार्याला वेग देण्याच्या सूचना दिल्या आहेत. वाहतूक ठप्प झाल्याने मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरात व दिल्ली या चार राज्यात जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाल्याचे बोलले जाते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT