Maharashtra emery minister working on empowerment of electricity distribution company
Maharashtra emery minister working on empowerment of electricity distribution company 
मुख्य बातम्या मोबाईल

फडणवीस सरकारने सुरू केलेली महावितरणची प्रादेशिक कार्यालये ठरली पांढरे हत्ती!

सरकारनामा ब्युरो

मुंबई : गेल्या सरकारच्या काळात पांढरे हत्ती ठरलेल्या, महावितरणचे प्रादेशिक कार्यालय असलेल्या सहव्यवस्थापकीय संचालकांना अधिकार बहाल करण्याच्या निर्णयाप्रत ऊर्जामंत्री आले आहेत. या संदर्भात सादर करण्यात आलेल्या सादरीकरणानंतर डॉ. नितीन राऊत यांनी ही माहीती दिली. असे झाले तर महावितरणच्या कामाला गती येणार असून राज्यातील वीज ग्राहकांना याचा फायदा होणार असल्याचे ते म्हणाले.

सादरीकरणामध्ये औरंगाबाद प्रादेशिक विभागामधिल आयपीडीएस, डीडीयूजीजेवाय, आरएफ मीटर बदली व सौर कृषीपंप या योजनांच्या प्रमाण आणि वेळ मर्यादेच्या विस्ताराशी संबंधित सर्व अधिकार,  प्रकल्पांचे बारकाईने निरीक्षण व प्रकल्प वेळेवर पूर्ण करण्यासाठी सहव्यवस्थापकीय संचालकांना व प्रादेशिक संचालकांना अधिकार प्रदान करणे आवश्यक असल्याची विनंती सहव्यवस्थापकीय संचालक सुनिल चव्हाण यांनी बैठकीत केली.

2016 साली गांधी जयंतीनिमित्त राज्यात चार प्रादेशिक कार्यालयाची पुणे, औरंगाबाद, नागपूर व कल्याण येथे मोठा गाजावाजा करून स्थापना करण्यात आली. यातील कल्याण व औरंगाबाद येथे सहव्यवस्थापकीय संचालक म्हणून वरिष्ठ आयएएस अधिकारी यांची नेमणूक तर पुणे व नागपूर येथे प्रादेशिक संचालक हे बिगर आयएएस अधिकारी यांची नेमणुक करण्यात आली होती. परंतु त्यांना कोणतेच अधिकार नसल्याने योजनांची अंमलबजावणी करणे अवघड झाल्याने ही प्रादेशिक कार्यालये पांढरे हत्ती ठरल्याची चर्चा यावेळी करण्यात आली.

वीज वितरण प्रणाली रोहित्रांवर अवलंबून असल्याने रोहित्रांचे वितरण व दुरुस्ती यासंबंधी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. नादुरुस्त वितरण रोहित्राचे तेलासाहित सर्वसमावेशक निविदा काढण्याचे अधिकार दिल्याने रोहित्र बदलण्यासाठी लागणारा वेळ कमी होईल. एचव्हीडीएस योजनेंतर्गत नवीन कृषीपंप जोडण्या देण्यासाठी जलद गतीने रोहित्राचे वितरण करणे सोईचे होईल. यानुषंगाने कृषिपंपाना नवीन वीज जोडणी देण्याचे धोरण ठरविण्यात येईल, अशी चर्चा यावेळी झाली.

वाशीममध्ये घोटाळा झाल्याची तक्रार

अकोला : दादासाहेब गायकवाड स्वाभिमान योजनेंतर्गत अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांना जमीन वाटप करण्याच्या प्रकरणात घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे. जी जमीन समाजकल्याण विभागाने खरेदी केली आणि लाभार्थ्यांना वाटप केली ती जमीन सोसायटीने गहाण असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते राजेंद्र पातोडे यांनी दिली.

वाशीम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील राजुरा येथील अढाव बंधूंकडून समाज कल्याण विभागाने ४. ४५ हे. आर. जमीन विकत घेतली होती. सदर जमीन सेवा सहकारी सोसायटी राजुराकडे गहाण आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT