sunil kedar
sunil kedar 
मुख्य बातम्या मोबाईल

सुनील केदार यांच्यामागे दिल्लीत सक्रिय असलेला महाराष्ट्रातील नेता?

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : सोनिया गांधी आणि राहुल गांधींच्या नेतृत्वाला आक्षेप घेणार्या कथित पत्रावरून महाराष्ट्र कॉंग्रेसमध्ये सुंदोपसुंदी सुरु झाली आहे. गांधींवर आक्षेप घेणाऱ्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना रस्त्यावर पाय ठेवू देणार नाही, असा इशारा दुग्धविकासमंत्री सुनील केदार यांनी दिला आहे. तर मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राहुलजींनी पक्षाची सूत्रे हाती घ्यावीत अशी विनंती करतानाच त्यांनी आदेश दिला तर लगेच महाविकास आघाडी सरकारमधून कॉंग्रेस बाहेर पडेल, असे सांगून टाकले आहे.

राहुल गांधी यांनी अध्यक्ष व्हावे, अशी मागणी प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यापाठोपाठ माजी मुख्यमंत्री व सध्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केली. महिला व बालकल्याणमंत्री यशोमती ठाकूर या राहुल गांधींच्या वर्तुळात असतात. त्यांनी कॉंग्रेसच्या डीएनएतच गांधी असल्याचे सांगितले. निष्ठेच्या या प्रदर्शनात सुनील केदार यांनी मात्र आघाडी घेत गांधींना आव्हान देणार्या नेत्यांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही असे सकाळी ट्वीट केले.

वादळाचे कारण ठरलेल्या या पत्रावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,दिल्लीत कित्येक वर्षे सक्रीय असलेले मुकुल वासनिक आणि राहुल यांचे मित्र माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांच्या स्वाक्षर्या आहेत. त्यांना केदार यांनी दिलेले आव्हान हा चर्चेचा विषय झाला असतानाच त्या मागचा बोलविता धनी दिल्लीत सक्रीय असलेला महाराष्ट्रातला एक नेता आहे, अशी चर्चा सुरु झाली. दरम्यान माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी स्वभावानुसार सुनील केदार बोलले ,गांधी घराण्याच्या पाठीशी आहोत हे त्यातले महत्वाचे प्रतिपादन आहे, असे म्हणत सारवासारव केली.

विजय वडेट्टीवार यांनी राहुल गांधी यांनी पक्षाची सूत्रे हाती घ्यावीत असे आवाहन केले असताना महाराष्ट्रातील सत्तेत सामील होण्याचे राहुल गांधींना मान्य नव्हते याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले.त्यावर वडेट्टीवार यांनी तसे असेल तर पक्ष महाविकास आघाडीतून लगेच बाहेर पडेल असे विधान केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT