Sadabhau Khot to Write Autobiography in Lock Down Period
Sadabhau Khot to Write Autobiography in Lock Down Period 
मुख्य बातम्या मोबाईल

लॉकडाऊनच्या काळात सदाभाऊ खोत लिहित आहेत आत्मचरित्र...'सरकारनामा'ला दिली माहिती

संपत मोरे

पुणे : माजी कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आजवरच्या सगळ्या आठवणी लिहायचा निर्णय घेतला आहे. 'लॉकडाऊन'च्या काळात मी माझा सगळा प्रवास लिहिणार आहे. मी अल्पभूधारक शेतकऱ्याच्या घरात जन्मलो. चळवळीत गेलो.आमदार मंत्री झालो. हा सगळा प्रवास मी लॉकडाऊनच्या काळात लिहितोय." अशी माहिती त्यांनी 'सरकारनामा' ला दिली.

खोत म्हणाले, "मी एका सामान्य कुटुंबात जन्माला आलो. वडिलांनी खूप कष्ट केले. वडिलांचे कष्ट बघत असताना मला शेतकऱ्यांच्या दुःखाची जाणीव झाली. मलाही लहानपणी रानामाळात राबावे लागत होते.  माझ्या आई वडीलांनी यांनी खुप यातना सहन केल्या. माझ्या आत्मचरित्रात माझे आई वडील, त्यांचे कष्ट, माझ्या गावातील माणस, चळवळीतील जिवाभावाचे सहकारी,केलेले संघर्ष  हे सगळं येणार आहे. मी आता हे लिहायला लागलो आहे."

"इस्लामपूर-शिराळ्याला जाताना मरळनाथपूर हे माझं छोटं गाव .या गावात माझं सगळं बालपण गेलं.  माझ्या लहानपणीच्या सगळ्या आठवणी माझ्या डोळ्यासमोर आहेत. माझं गाव तस दुर्लक्षित. कोणाच्या अध्यात मध्यात नसलेलं. याच गावातला मी सदा नावाचा मुलगा. चळवळीत गेलो. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लढलो. पोलिसांचा मार खाल्ला. तुरुंगात गेलो. मी सगळ्या महाराष्ट्रात भाऊ म्हणून ओळखला जाऊ लागलो. माझे विरोधक सुद्धा मला भाऊ म्हणतात. ही सगळी चळवळीची आणि चळवळीत केलेल्या कामाची पोहोच पावती आहे." असं सदाभाऊ म्हणाले.

"माझ्या आई वडिलांनी माझ्यावर कष्टाचे संस्कार केले. माणूस कष्टाने झिजत नाही. कष्टाला फळ मिळते.हे त्यांनी शिकवले आणि ते खरं झालं.मी चळवळीत जे कष्ट केले.त्याच चीज झालं. एका खेड्यातील एक पोरगा आमदार झाला.मंत्री झाला.ही सगळी जनतेला सांगण्यासारखी गोष्ट आहे. मी लेखक नाही पण चांगला वाचक आहे. लोकांना सांगावी अशी माझी गोष्ट आहे.ती मी लिहायला लागलो आहे." असे खोत म्हणाले.

हे देखिल वाचा - कमलनाथांनी दिलं उत्तर; मोदी सरकारनं लॉकडाऊन 24 मार्चला का जाहीर केला?...
नवी दिल्ली - मध्य प्रदेशमधील कॉंग्रेस सरकार पडण्यासाठीच केंद्रातील भाजप सरकारने कोरोनाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी केला आहे. सध्याच्या कोरोनामुळे निर्माण झालेल्या स्थितीला भाजप कारणीभूत आहे. संसदेचे अधिवेशन केवळ मध्य प्रदेशमधील अधिवेशन सुरू राहावे, यासाठी सुरू ठेवण्यात आले होते. त्यातून कॉंग्रेसच्या सरकारला पाडणे हाच भाजपचा डाव होता, असे त्यांनी सांगितले.....

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT