sanjay raut sarkarnama.jpg
sanjay raut sarkarnama.jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

Maharashtra Politics: 'हा काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न, कोणी अपमानित झालं असेल तर मला माहित नाही'

सरकारनामा ब्युरो

मुंबई: ''पंजाबमध्ये (Panjab) कॅप्टन अमरिंदर सिंग (Capt. Amarinder Singh)  यांनी  मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणे हा काँग्रेस पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. कोणी अपमानित झालं असेल तर मला माहित नाही,'' असे स्पष्टीकरण  शिवसेना खासदार संजय राऊत (Shivsena MP sanjay Raut)  यांनी दिले आहे. '' ज्या प्रकारे गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी (Former CM Vijay Rupani)  यांनी राजीनामा दिला  आणि तो भारतीय जनता पक्षाचा अंतर्गत प्रश्न होता,  तसाच अमरिंदर सिंग यांचा राजीनामाही  पंजाब काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे,''अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपली भुमिका स्पष्ट केली आहे. 

तसेच, 'परप्रांतीय विषयावर शिवसेनेने कधीच राजकारण केलं नाही. देशात या विषयावर कोण राजकारण करतंय ते चंद्रकांत पाटील यांनी तपासावं,'' असा टोलाही त्यांनी लगावला. तसेच,'आम्ही असं म्हणणार नाही कि ते हवेत गोळ्या झडतात पण चंद्रकांत पाटील यांनी दिलेलं ४८ तसंच अल्टिमेटम संपलं,'' असल्याचं म्हणत त्यांनी आता यावर त्यांनाच विचारा, काय झालं असही त्यांनी म्हटलं आहे. 

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून भाजपा नेते शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत, यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उत्तर देताना म्हटलं होतं की,  गेले २० ते २२ महिने असंच चाललयं.  ते आमच्या एकाही आमदाराला हात लावू शकले नाहीत. माणसं पळवायचा कितीही प्रयत्न केला तरी लोकांचं मोदींवर प्रेम आहे,'' असं म्हटलं होत. यालाही संजय राऊतांनी उत्तर दिलं आहे. ''त्यांच्याच भाषेत सांगायचं तर त्यांनी थोडे दिवस थांबावं...'' असा जणू इशाराच संजय राऊत यांनी दिला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT