nana patole
nana patole 
मुख्य बातम्या मोबाईल

`महाराष्ट्राला पहिल्यांदा लाभला काळ्या केसांचा विधानसभा अध्यक्ष`

राजू सोनवणे

मुंबई : विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर नाना पटोले यांच्यावर अनेकांनी कौतुकाचा वर्षाव केला. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी महाराष्ट्राला प्रथमच काळ्या केसांचा अध्यक्ष लाभल्याचे सांगत त्यांच्या तरुणपणावर शिक्कामोर्तब केले.

त्यावर काही सदस्यांनी पटोले हे केसांना कलप लावत असल्याचे सांगितल्यानंतर असे असले तरी त्यांचे व्यक्तिमत्त्व तरुणासारखे असल्याचे सांगत तरुण अध्यक्ष लाभल्याचे ठासून सांगितले. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पटोले यांचे अभिनंदन केले. फडणवीस यांनी नाना पटोले हे कृषीमंत्री झाले असते तर बरं वाटलं असतं, असा टोला लगावला. 

बच्चू कडू म्हणाले की मागच्या नानांचा (हरिभाऊ बागडे) यांचा अनुभव आम्हाला चांगला नव्हता. सर्वांनाच बोलायला दिल पाहिजे
जयंत पाटील आणि छगन भुजबळ थोडं कमी बोलले असते तर इतरांना बोलण्याची संधी मिळाली असती.या सभागृहात भेदभाव नको, अशी अपेक्षा व्यक्त केली.

नाना पटोले हे विदर्भातील आहेत. त्यामुळे त्यांना जास्त मदत होईल म्हणून निवड करण्यात आली. काल सरकारचे बहुमत सिद्ध करण्याची प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे पार पाडली. म्हणून वळसे पाटील यांच अभिनंदन करतो, असे अशोक चव्हाण यांनी सांगितेल.

बाळासाहेब थोरात म्हणले की अध्यक्ष म्हणून नाना पटोले यांचे नाव एकमताने  समोर आले. या सभागृहात अनेक जेष्ठ नेते आहेत त्यांचा अपमान होयला नको, अशी अपेक्षा त्यांनी व्यक् केली. एखाद्या महिलेला हे पद दिले असते तर अधिक आनंद झाला असता, असेही मत त्यांनी व्यक्त केले.

तीन पक्षांचं सरकार चालवत असताना एक ताकदवान विरोधी पक्ष सभागृहात आहे. त्यामुळे कामकाज सुरळीत चालवाल ही खात्री आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT