chita27.jpg
chita27.jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

..तर मुख्यमंत्र्यांनी राठोडांना फाडून खाल्लं असतं...

सरकारनामा ब्युरो

नाशिक : "पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणात सरकार पोलिस प्रशासन, बलात्काराला वाचवतंय," असा आरोप चित्रा वाघ यांनी आज पत्रकार परिषदेत केला. 'राठोड यांना वाचविण्यासाठी महाविकास आघाडीने एकी केली आहे,' असा आरोप वाघ यांनी केला आहे. 'माझ्या पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात मला गुंतविण्याचा सरकारचा डाव आहे,' असे वाघ यांनी सांगितले.

या प्रकरणात सर्व पुरावे असताना वनमंत्री संजय राठोड यांच्यावर पोलिसांनी कुठलीही कारवाई केलेली नाही, कारण हे कोणी साधी व्यक्ती नाही, तर हे मंत्री आहेत. घटनेच्या दिवशी 100 या क्रमांकावर फोन करून या प्रकरणाशी माझा काहीही संबध नाही, असे अरूण राठोडने पुणे पोलिसांनी सांगितले होते. या दिवशी पोलिस कंट्रोलला गेलेल्या फोनची दखल का घेतली नाही, असा प्रश्न वाघ यांनी उपस्थित केला आहे. 

चित्रा वाघ म्हणाल्या, "सरकार पोलिस प्रशासन, बलात्काराला वाचवत आहे. त्या 12 आँडिओ क्लिप बाबत अद्याप कोणतीही माहिती पोलिसांनी दिलेली नाही. उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्री नसते तर त्यांनी राठोडांना फाडून खाल्लं असतं...महिला सुरक्षा फक्त भाषणात उरली आहे का... मंत्रीमंडळातले सर्व मंत्री एकसारखे आहेत. सरकारमध्ये व्यभिचाऱ्याचे उदात्तीकरण सुरू आहे."  पूजा चव्हाणला न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे.   

पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी पुण्याच्या लष्कर न्यायालयात गुन्हा दाखल करण्याबाबतचा अर्ज दाखल करण्यात आला आहे. 'पोलिसांनी गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास करावा,' अशी मागणी हा अर्जात करण्यात आली आहे. लीगल जस्टीस सोसायटीतर्फे अॅड भक्ती पांढरे यांनी काल लष्कर न्यायालयात हा अर्ज केला आहे.   

पूजा चव्हाण हिच्या मृत्यूप्रकरणी कोणाची तक्रार नाही. त्यामुळे गुन्हा दाखल होऊ शकत नाही, अशी भूमिका पुणे पोलिसांनी घेतल्यानंतर या प्रकरणात खासदार गिरीश बापट यांच्या स्नुषा स्वरदा बापट यांनी काल थेट वानवडी पोलिसांकडे अर्ज देऊन वनमंत्री संजय राठोड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी आहे. 

चित्रा वाघ यांनी याबाबत काल पुण्यात येऊन पुणे पोलिसांवर तोफ डागली होती. त्यानंतर पुण्यातील पदाधिकारीही जागे झाले आणि त्यांनी या प्रकरणात लक्ष घालण्यास सुरवात केली. पूजा चव्हाण हिचा मृत्यू पुण्यात झाला आणि त्याबाबत संशय व्यक्त होत असतानाच पुण्यातील भाजपचे पदाधिकारी मात्र यावर अधिकृतरित्या चकार शब्द काढत नव्हते.  बापट यांनी तक्रार देऊन या प्रकरणात लक्ष घातले.   

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT