Mahavikas Aghadi leaders cautious due to ED's inquiry .jpg
Mahavikas Aghadi leaders cautious due to ED's inquiry .jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

'ईडी'च्या कारवाईमुळे सत्ताधारी सावध; राष्ट्रवादीमध्ये घालमेल तर शिवसेनेत धाकधूक   

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कारवायांचा धसका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतला आहे. कोणताही दगाफटका नको याची खबरदारी घेताना महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सावध पवित्रा घेतला आहे. तरीही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हवालदिल झाले आहेत तर शिवसेनेच्या नेत्यांची धाकधुक वाढली आसल्याचे सांगितले जाते. (Mahavikas Aghadi leaders cautious due to ED's inquiry)  

भाजपने विरोधी पक्षातील नेत्यांविरोधात तसेच भाजपच्या विरोधात जोरदार आवाज उठवणाऱ्या नेत्यांना 'ईडी'चा धाक दाखवून जेरीस आणले जाते. असा भाजपवर विरोधी पक्षांचा देशपातळीवर आरोप आहे. छगन भुजबळ यांना अटक झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना ईडी बाबत जाणीव झाली. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची चौकशी ईडीने सुरू केली आहे. देशमुख यांच्या कुटुंबाची चौकशी सुरू आहे.

याचबरोबर भाजपमधून राष्ट्रवादीत आलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची जुन्या प्रकरणावरून पुन्हा चौकशी सुरू झाली आहे. यामुळे प्रकारामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हवालदिल झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या चौकशीचे शुक्लकाष्ट सुरू आसतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात आसलेल्या संस्थांना देखील ईडीने लक्ष्य केले आहे. त्यामुळेदेखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घालमेल वाढल्याचे कार्यकर्ते सांगत आहेत.

राष्ट्रवादीप्रमाणे शिवसेनेत देखील धाकधुक वाढली असल्याचे शिवसैनिकांत चर्चा आहे. आमदार प्रताप सरनाईक यांची मागील काही महिन्यांपासून ईडी चौकशी करीत आहे. सरनाईक यांनी तर मध्यंतरी ईडीच्या छळातून मुक्त होण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून भाजप बरोबर पुन्हा घरोबा करण्याची विनंती केली होती. तर मंत्री अनिल परब यांच्या विषयी राज्य भाजपाचे नेते जाहीरपणे कारवाईची भाषा करीत आसतात. यामुळे शिवसेनेत धाकधुक वाढल्याचे सांगितले जाते.

राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या पक्षातील नेते, आमदार यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. याची नोंद घेत काँग्रेसचे नेते, मंत्री सावध पावले टाकत आहेत. एकंदरीत ईडीच्या धसक्याने महाविकास आघाडीतील पक्षांचे नेते सावध भुमिकेत असल्याचे मानले जाते.
Edited By - Amol Jaybhaye 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT