Dilip Walse Patil - Shivajirao Adhalrao
Dilip Walse Patil - Shivajirao Adhalrao 
मुख्य बातम्या मोबाईल

आढळराव - वळसे पाटलांनी जिंकून दिली मंचर ग्रामपंचायत

डी.के.वळसे पाटील.

मंचर  : आंबेगाव तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या मंचर ग्रामपंचायतीच्या आठ जागांसाठी निवडणूक रिंगणात एकूण २१ उमेदवार उभे होते.महाविकास आघाडीचे सात व एक अपक्ष उमेदवार विजयी झाला. महाविकास आघाडीचा एक, कॉंग्रेसचे दोन व भाजप सात व अपक्ष तीन उमेदवार पराभूत झाले.त्यामध्ये आंबेगाव तालुका कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष राजू इनामदार यांचा समावेश आहे.

राज्याचे कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील व शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मंचर ग्रामपंचायतीसाठी महाविकास आघाडीची स्थापना करण्यात आली होती. भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे,शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा,शिवसेनचे पंचायत समिती सदस्य राजाराम बाणखेले,बाळासाहेब बाणखेले,माजी सरपंच दत्ता गांजाळे,उपजिल्हा प्रमुख सुनील बाणखेले,जे.के.थोरात, मंगेश बाणखेले यांनी महाविकास आघाडीची प्रचार यंत्रणा राबवली होती.

१७ जागांपैकी महाविकास आघाडीच्या नऊ जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या.त्यामध्ये सात जागा शिवसेनेच्या व दोन जागा राष्ट्रवादी कॉंग्रेस जागांचा समावेश होता.निवडणुकीत निवडून आलेल्यांमध्ये  महाविकास आघाडीत शिवसेनेच्या दोन,राष्ट्रवादी कॉंग्रेस दोन व माजी खासदार (स्व) किसनराव बाणखेले कॉंग्रेस गटाच्या तीन जागा निवडून आल्या आहेत.एक अपक्ष आला आहे.कॉंग्रेस पक्ष महाविकास आघाडीत सहभागी झाला नव्हता.भाजपलाही जनाधार मिळाला नाही.

बिनविरोध निवडून आलेले उमेदवार :- विशाल मोरडे, दिपाली थोरात,ज्योती निघोट, सविता दिनकर क्षीरसागर, रंजना शेटे, किरण राजगुरू, सतीश बाणखेले, ज्योती प्रकाश थोरात, ज्योती संदीप बाणखेले.

निवडून आलेले उमेदवार: युवराज प्रल्हाद बाणखेले, वंदना कैलास बाणखेले, सुप्रिया शिवप्रसाद राजगुरव,पल्लवी लक्ष्मण थोरात, माणिक संतोष गावडे, कैलास गांजाळे, अरुण बाणखेले, श्याम थोरात(अपक्ष)

माजी खासदार (स्व) किसनराव बाणखेले यांचे नातू युवराज बाणखेले हे सर्वाधिक ७८१मतांधिक्याने निवडून आले.महाविकास आघाडीच्या पदाधिकार्यांनी विजयी उमेदवारांसह भैरवनाथ मंदिरात जाऊन तळी भरून जल्लोष साजरा केला.यावेळी (स्व)किसनराव बाणखेले अमर रहे, दिलीप वळसे पाटील व शिवाजीराव आढळराव पाटील जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या.

Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT