Hassan Mushriff
Hassan Mushriff 
मुख्य बातम्या मोबाईल

सरपंच निवडीमध्ये ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ गटाची सरशी

सरकारनामा ब्युरो

कागल : कागल तालुक्यात आज झालेल्या सरपंच निवडीमध्ये ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गटाने बाजी मारली. एकूण 53 सरपंच निवडीपैकी तब्बल 31  ग्रामपंचायतींवर मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गटाचे सरपंच झाले. शिवसेनेचे माजी आमदार संजय घाटगे गटाचे नऊ, शिवसेनेचे खासदार प्रा. संजय मंडलिक गटाचे सहा, भाजपच्या जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे गटाचे चार, त्यांच्याच बाजूचे रणजितसिंह पाटील गटाचा व बाबासाहेब पाटील गट प्रत्येकी एक अशा निवडी झाल्या. तर एका गावात स्थानिकच्या मराठा रियासातचा सरपंच झाला.

मंत्री हसन मुश्रीफ गटाच्या निवड झालेल्या 31 गावांमध्ये सुळकुड, मौजे सांगाव, लिंगनूर दुमाला, करनूर, वंदूर, शंकरवाडी, व्हन्नुर, सिद्धनेर्ली, केनवडे, पिंपळगाव बुद्रुक, मळगे खुर्द, मळगे बुद्रुक, केंबळी, बेलवळे खुर्द, बेलवळे बुद्रुक, बिद्री, उंदरवाडी, अर्जुनी, लिंगनूर कापशी, खडकेवाडा, नानीबाई चिखली, कौलगे, माद्याळ, वडगाव, तमनाकवाडा, आलाबाद, कासारी, मागनूर, बेलेवाडी मासा, बोळावीवाडी, करंजीवणे या गावांचा समावेश आहे.

शिवसेनेच्या माजी आमदार संजय घाटगे गटाच्या सरपंच झालेल्या नऊ गावांमध्ये शेंडूर, गोरंबे, म्हाकवे, बानगे, साके, भडगाव, सोनगे, यमगे, हसुर खुर्द तर शिवसेनेच्याच खासदार संजय मंडलिक गटाचे सरपंच झालेल्या सहा गावांमध्ये बस्तवडे, सोनाळी, गलगले, कुरुकली, हळदी, मेतके या गावांचा समावेश आहे.

भाजपचे सरपंच झालेल्या गावांमध्ये समरजीत घाटगे गटाचे सरपंच झालेल्या एकोंडी, कुरणी, सावर्डे बुद्रुक, शिंदेवाडी या पाच ग्रामपंचायतींचा समावेश आहे. भाजपच्याच रणजीतसिंह पाटील गटाचा हळदवडे येथे व याच पक्षाच्या बाबासाहेब पाटील गटाचा वाळवे खुर्द येथील सरपंच झाला तर बेनिक्रे गावात स्थानिकच्या मराठा रियासातचा सरपंच झाला.
Edited By - Amit Golwalkar
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT