Sarkarnaa Banner (37).jpg
Sarkarnaa Banner (37).jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

नंदिग्रामच्या निकालाबाबत ममता बॅनर्जींच्या याचिकेवर आज सुनावणी.. 

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील निवडणुक होऊन दीड महिन्या झाला आहे, पण अजून त्याबाबतचा वाद अद्यापही संपलेला नाही. ता. २ मे रोजी निकाल लागल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी सांगिलले होते की नंदिग्रामच्या जनतेने दिलेला कैाल मी स्वीकारला आहे. पण मतमोजणीत झालेल्या गोंधळाविरोधात न्यायालयात जाणार आहे. mamata banerjee moves high court challenging assembly election result in nandigram

तृणमूल कॅाग्रेसच्या अध्यक्षा, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नंदिग्राममधील निकालाच्या विरोधात उच्च न्यायालयात आव्हान दिलं होते. त्यांनी न्यायालयात सादर केलेल्या याचिकावेर आज सुनावणी होत आहेत. भाजपचे नेते शुभेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांचा पराभव केला होता. ममतादीदींच्या तृणमूलला २०० जागा मिळाल्या होत्या. त्या तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्या आहेत. 

शुभेंदू अधिकारी हे पश्चिम बंगाल विधानसभेमध्ये विरोधीपक्षनेते आहेत. ते यापूर्वी ममतादीदींचे सहकारी होते. निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. तृणमूलने नंदिग्राम मतदार संघात पुन्हा मतमोजणी करण्यात आली होती. यात गोंधळ झाल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला आहे. निवडणूक आयोगाने ममतांचा दाव्याचे खंडन केले होते. त्यानंतर ममतांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. 

.. तर भविष्यात काँग्रेसला वगळून महाविकास आघाडी : बड्या नेत्याचे संकेत
 मुंबई : "महाविकास आघाडी सरकारमध्ये तीन पक्ष आहेत. त्या तिघांनी एकत्रित राहावं याला सर्वांनीच प्राधान्य द्यावे. त्यातूनच एखाद्या पक्षाला स्वबळावर लढण्याची इच्छा असेल तर उरलेले दोन पक्ष नक्कीच एकत्रित राहतील त्यादृष्टीने 'सामना' ने मत व्यक्त केले आहे मात्र, महाराष्ट्रातील जनतेचीही तशीच इच्छा दिसते," असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT