Mamata Banerjee .jpg
Mamata Banerjee .jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

खेला होबे; ममता बॅनर्जी यांनी जिंकले नंदीग्राम अन् बंगालही

सरकारनामा ब्यूरो

नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसने चांगली आघाडी घेत भाजला मागे सोडले आहे. तृणमूल काँग्रेसने २०९ जागांवर आगाडी घेतली आहे. तर भाजप ८१ जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस आणि डावे पक्ष १ जागेवर आघाडीवर आहे. मात्र, तृणमूल काँग्रेस आघाडीवर असताना ममता बॅवर्जी पिछाडीवर होत्या. तो तृणमूलसाठी धक्का मानला जात होता. 

नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी आणि शुभेन्दु अधिकारी यांच्यात अटीतटीची लढत सुरू आहे. सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये शुभेन्दु अधिकारी यांनी ७००० हजार मतांची आघाडी घेतली होती. मात्र, ममता बॅनर्जी यांनी ती आघाडी तोडत पुन्हा अधिकारी यांच्यावर २७०० मतांची आघाडी घेतल्यामुळे तृणमूला दिलासा मिळाला होता. मात्र ममता बॅनर्जी आणि शुभेन्दु अधिकारी यांच्या फारच अटितटीची लढत सुरु होती.  मात्र, शेवटच्या फेरीत ममता बॅनर्जी यांचा १२ मतांनी विजय झाला आहे.    

ममता बॅनर्जी या नंदीग्रामधून विडवणूक लढवत असल्यामुळे भाजपाने या मतदारसंघावर सुरुवातीपासूनच लक्ष केंद्रीत केले होते. त्यासाठीच भाजपाने या मतदारसंघासाठी एकेकाळी ममता बॅनर्जी यांचे सहकारी आणि तृणमूलचे फायरब्रँड नेते सुवेंदू अधिकारी यांना पक्षात आयात करून उमेदवारी दिली. भाजपचे ज्येष्ठ नेते कैलास विजयवर्गीय म्हणाले होते की, नंदीग्राममध्ये तृणमूल कॉंग्रेसच्या प्रमुख आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी जवळपास 25 हजार मतांनी पराभूत होतील. 

पश्चिम बंगाल निवडणुकीकडे संपुर्ण देशाचे लक्ष लागले आहे. भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये जोरदार टक्कर होईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता, मात्र, तृणमूलने निर्णायक आघाडी घेल्यामुळे हा अंदाज फोल ठरतांना दिसत आहे. पश्चिम बंगाल निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने सर्व ताकत पणाला लावली होती. त्यासाठी भाजपने अनेक खासदारांनाही विधानसभा नवडणुकीच्या मैदानात उतरवले होते. मागील २००६ च्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसचे वोट शेअर ४४.९ टक्के होता तर भाजपचा १०.२ टक्के होता. काँग्रेस लेफ्ट आघाडीला ३७.९ टक्के मते मिळाली होती तर इतरांच्या खात्यात ७ टक्के मते होती. 

आसाममधील सत्ता टिकविण्यासह अन्य राज्यांत सत्तेत येण्यासाठी भाजपने जोर लावला होता. पश्चिम बंगालमधील २९४ पैकी २९२ विधानसभा जागांचे निकाल आज हाती येणार आहेत. दोन ठिकाणी निवडणूक झालेली नाही. एकीकडे कोरोनाने कहर केलेला असतानाही मतदानावर याचा फारसा परिणाम झालेला पहायला मिळाला नाही. 

ममता बॅनर्जी गेल्या १० वर्षांपासून पश्चिम बंगालमध्ये सत्तेत आहे. जनता पुन्हा एकदा त्यांच्या हाती सत्तेच्या चाव्या देणार असल्याचे सुरुतीच्या कलामध्ये दिसून येत आहे. ममता बॅनर्जी यांच्यासमोर भाजपाने कडवे आव्हान निर्माण केले होते. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जोरदार प्रचार केला आहे. यामुळे ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील आव्हानात्मक निवडणुकीला सामोरे जावे लागत आहे. २९४ जागांच्या विधानसभेत १४७ बहुमताचा आकडा आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT