MLA Bharat Bhalke Teaching in ZP School
MLA Bharat Bhalke Teaching in ZP School 
मुख्य बातम्या मोबाईल

आमदार भारत भालके झाले शिक्षक

हुकूम मुलाणी

मंगळवेढा : राज्यातील सत्ता संपादनासाठी सत्ताधारी पक्षांसह विरोधक एक एक  आमदारावर लक्ष ठेवून असताना आ.भारत भालके यांनी मात्र गाव भेट दौय्राच्या निमित्ताने ग्रामीण भागात अडचणी  जाणून घेत असताना त्यांनी लक्ष्मी दहिवडी येथील जिल्हा परिषद शाळेतील तिसऱ्या वर्गात शिक्षकांची भूमिका बजावली.

कुस्तीच्या आखाड्यात तरबेज आमदार भालके यांची पंचगिरी राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली असताना त्यांनी लक्ष्मी दहीवडीच्या तिसऱ्या वर्गावर हजेरी लावली. विधानसभेच्या प्रचारादरम्यान भालकेच्या कमी शिक्षणावर आरोप करण्यात आले. त्याला प्रत्युत्तर देताना भालके म्हणाले होते की मी कमी शिकलो असलो तरी चांगले शिकलो आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या  वर्ग भेटीमुळे शिक्षणात असलेली चुणूक दाखवण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात झाली. 

त्यांनी मतदारांचे आभार मानण्यासाठी देगाव,मल्लेवाडी, घरनिकी, मारापुर, महमदाबाद (शे), लक्ष्मी दहीवडी, आंधळगाव, लेंडवेचिंचाळे,शिरसी या गावाच्या दौऱ्याचे आयोजन केले होते. दरम्यान लक्ष्मी दहीवडी येथे नुकतीच जि. प.शाळेची भिंत कोसळली होती.या दौऱ्यात त्यांनी वेळ काढून शाळेला भेट दिली. दरम्यान  तिसरीच्या वर्गातील विद्यार्थ्यांकडून नाव,व इयत्ता शैक्षणिक प्रगतीची माहिती विचारून घेतली यावेळी वर्गशिक्षिका अनिता बुरकुल उपस्थित होत्या. यावेळी शाळेच्या नादुरुस्तीबाबत लक्ष घालण्यास त्यांनी संबंधितांना सांगितले. यापूर्वीच मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी लेखी कळवून तालुक्यातील नादुरुस्त खोल्याची करण्याच्या दृष्टीने सूचना देण्यात आल्याचे सांगितले.

यावेळी त्यांच्या समवेत यावेळी विजयकुमार खवतोडे,लतीफ तांबोळी,पी बी पाटील, भारत नागणे,महादेव जाधव,राहुल सावंजी,संकेत खटके, स्वामी मेजर,प्रज्वल शिंदे,रावसाहेब फटे,अल्ताफ सुतार,अशोक माने,शाळेतील शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT