manohar bhosale.jpg
manohar bhosale.jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

मनोहर भोसले करमाळा पोलीसांच्या ताब्यात

सरकारनामा ब्युरो

बारामती न्यायालयाने मनोहरमामा ऊर्फ मनोहर भोसलेला न्यायालयीन कोठडी सुनावली. पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला बारामती न्यायलयात (Baramati Court)  हजर करण्यात आले होते. यावेळी  प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती एन. व्ही. रणवीर यांनी मनोहरमामाला न्यायालयीन कोठडीचे आदेश दिले. न्यायालयीन कोठडीचे आदेश मिळाल्यानंतर  करमाळा पोलीसांनी (Karamala Police)  मनोहर भोसलेला ताब्यात घेतले.

दरम्यान, बारामतीच्या शशिकांत खरात यांच्या वडिलांना अघोरी उपचार  आणि त्यांची  आर्थिक फसवणूक केल्याने  खरात  यांनी मनोहर भोसले आणि त्याच्या दोन अन्य साथीदारांवर बारामती पोलीसांनी गुन्हा नोंदवला होता. त्यावर  10 तारखेला मनोहर भोसलेला बारामती पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्याला सुरवातीला 5 दिवस आणि नंतर 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.

सुनावणी दरम्यान,  मनोहर भोसलेला एन व्ही रणवीर यांच्या न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. मनोहर भोसलेचा एक साथीदार ओंकार शिंदे याला न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. तर त्यांचा एक साथीदार अद्याप फरार आहे. परंतु पोलिसांनी भोसलेची न्यायालयीन कोठडी मागण्याचे कारण काय,  असा सवाल आरोपीच्या उपस्थित केला आहे.  

पोलिसांनीच न्यायालयीन कोठडी मागितल्यामुळे पोलीस संशयास्पद वागत आहेत म्हणून पोलिसांविरोधात मनोहर भोसले यांचे वकील उच्च न्यायालयात जाणार असल्याची माहिती ऍड. रुपाली ठोंबरे यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT