1sambhajiraje_40mp_0
1sambhajiraje_40mp_0 
मुख्य बातम्या मोबाईल

मराठा समाजाने पुन्हा एकत्र येण्याची गरज... 

सरकारनामा ब्युरो

मुंबई : सारथी संस्थेवरून सध्या आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. त्यामुळे सारथी संस्थेच्या अस्तित्वाचा प्रश्न पुन्हा चर्चत आला आहे. याबाबत खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी सोशल मीडियावर आक्रमक पवित्रा घेतला आहे. सारथी संस्थेसाठी मराठा समाजाने पुन्हा एकत्र येण्याची गरज आहे.. सारथी संस्थेच्याबाबत संबंधित मंत्र्यांनी दुटप्पी भूमिका सोडून द्यावी, अशी मराठा समाजाची भावना आहे, असा टोला संभाजीराजेंनी राज्य सरकारला लगावला आहे. या माध्यमातून त्यांनी अनेक प्रश्न राज्य सरकारला विचारले आहेत.  सारथी संस्था बंद करण्यासाठी बरेच प्रयत्न केले गेल्याचा आरोप खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केला आहे.


चार दिवसांपूर्वी मराठा क्रांती मूक मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी सारथी संस्थेबाबत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना घेराव घातला होता. मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या राजीनाम्याची मागणी मराठा क्रांती मूक मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी केली होती.

या पार्श्वभूमीवर सारथी संस्था बंद पडणार नाही, असं वडेट्टीवार यांनी सांगितले होते. ते कोरोनाचा आढावा घेण्यासाठी पुण्यात आले होते. यावेळी वडेट्टीवार म्हणाले की “काही लोक सारथी संस्थेबाबत  राजकारण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. यामागे कोण आहे ? याबाबत मी नंतर बोलेल”.

वडेट्टीवारांच्या या प्रतिक्रियेनंतर छत्रपती संभाजीराजे यांनी राज्य सरकारला काही प्रश्न विचारले आहेत. याबाबत छत्रपती संभाजीराजे म्हणतात की मराठा समाजाने संघर्ष करुन मिळवलेली आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने अस्तित्वात आलेली ही संस्था आहे.

राजर्षी शाहू महाराजांच्या वंशजाच्या नात्याने समाज जागा करणं, हे माझं कर्तव्य आहे. त्यामुळे सारथीच्या स्वायत्ततेसाठी आणि भावी पिढीच्या कल्याणासाठी मराठा समाजाने पुन्हा एकदा एकत्र यावं. सारथी संस्थेचे पंख छाटण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, सारथी संस्थेबाबत समाजाला जे पाहिजे तेच होईल. प्रत्येकवेळी केवळ आश्वासने देऊन मराठा समाजाची दिशाभूल केली जाते. फक्त आश्वासनं देऊन ही संस्था बंद करायचा विचार आहे का? तर तसेही सांगा...” 


संभाजीराजे म्हणतात, “सारथी संस्थेची स्वायत्ता राखणार, असा शब्द राज्य सरकारने दिला होता. मात्र, आज सारथी संस्था स्वायत्त राहिली आहे का? संस्थेमध्ये गैरव्यवहार केला, असा आरोप करुन संस्था बदनाम केली गेली. तिची चौकशीसुद्धा केली, त्याचे पुढे काय झाले? की तो केवळ फार्स होता? मुळात सारथी संस्था कोणत्या उद्दिष्टांसाठी अस्तित्वात आली होती? मात्र, आता कोणती उद्दिष्टे समोर आणली जात आहेत?” 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT