MNS .jpg
MNS .jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात मराठी ठेकेदाराला धमकी; मनसेचा आरोप

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : राज्याचे पर्यटनमंत्री व शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या वरळी मतदारसंघात शिवसेनेचे पदाधिकारी मराठी ठेकेदाराला फोन करून धमकावत, असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. याबाबत मनसेच्या (MNS) कार्यकर्त्यांनी म्हाडा अधिकाऱ्याला जाब विचारत त्यांच्या तोंडाला काळे फासले आहे. (Marathi contractor threatened in Aditya Thackeray's constituency; MNS allegation)

काय आहे प्रकरण?

काव्या इंटरप्रायजेस या कंपनीला वरळी मतदारसंघातील १ कोटी १९ लाखांच्या कामाचे कंत्राट मिळाले होते. त्यासाठी ८ ऑक्टोबर २०२० या कामाचे आदेश (Workorder) काढण्यात आले. तसेच शिवडी मतदारसंघात २० लाख ७१ हजारांची कामे मिळाली. या कामाच्या सिमेंट चाचणीचा रिपोर्टही ९ नोव्हेंबर २०२० रोजी प्राप्त झाला. काव्या इंटरप्रायजेसने शासनाच्या नियमांप्रमाणे ई निविदा भरून कंत्राट मिळवले होते. परंतु टक्केवारीसाठी मराठी कंत्राटदाराला काम करू न देता शिवसेनेचे एजेंट काम रद्द करण्यासाठी धमकावण्याचा फोन करत होते, असा आरोप मनसेने केला आहे.  

माजी आमदार सुनील शिंदे यांच्या नावाने धमकी देण्यात येत होती. वारंवार पाठपुरावा करूनही म्हाडाचे अधिकारी दबावात येऊन व टक्केवारीसाठी काम करू देत नव्हते. कंपनीने वारंवार पत्र व्यवहार करूनही म्हाडाकडून चालढकल करण्यात येत होती. यावरून मनसेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला.  मराठी मानसाने मुंबईमध्ये काम करायचे नाही का असा सवाल करत, मनसेच्या कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांच्या अंगावर कागद पत्रे भिरकावली, मनसेच्या धोषणा देत त्यांच्या तोंडाला काळे फासले.

हे ही वाचा 

शिवसेना आमदाराचे अमानुष कृत्य; ठेकेदाराच्या अंगावर टाकली गटारातील घाण, व्हिडिओ व्हायरल
 
मुंबई : मान्सून (Monsoon) दाखल झाल्यानंतर पहिल्या दिवशी मुंबईतील (Mumbai) अनेक भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साठले. त्यामुळे अनेक भागातील जनजीवन ठप्प झालं. पावसाळ्याआधी नालेसफाईची कामं पूर्ण केल्याचा दावाही महापालिकेकडून करण्यात आला. पण दुसरीकडे नालेसफाईच्या कामावरून एका ठेकेदाराला शिवसेनेच्याच आमदाराकडून अमानुष वागणूक दिल्याचे समोर आले आहे. ते मुंबईच्या चांदिवली भागातील आमदार आहेत. मुंबई मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पाणी साठत आहे. चांदिवली भागातही मोठ्या प्रमाणावर पाणी साठल्याच्या तक्रारी आल्यानंतर आमदार लांडे कार्यकर्त्यांना घेऊन त्याठिकाणी गेले. तिथे ठेकेदारालाही बोलावून घेण्यात आले. 

एका कार्यकर्त्यांकडून ठेकेदाराला पावसाच्या पाण्यात ढकलून दिले जाते. त्यानंतर गटाराशेजारी साचलेली घाण, कचरा ठेकेदाराच्या अंगावर टाकण्यात सांगण्यात येते. त्यानुसार दोघे जण ठेकेदाराच्या अंगावर गटातील घाण टाकताना दिसतात. या प्रकारामुळे लांडे यांच्यावर टीका होऊ लागली आहे. तर अनेकांनी लांडे यांच्या कृत्याचे समर्थन करत ठेकेदाराला हिसका दाखवल्याचे म्हटले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT